मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

स्मृती मंधाना बनली Superwoman; हवेत उडी घेत पकडला अफलातून कॅच, पाहा Flying Smriti चा VIDEO

स्मृती मंधाना बनली Superwoman; हवेत उडी घेत पकडला अफलातून कॅच, पाहा Flying Smriti चा VIDEO

England Women vs India Women: भारत आणि इंग्लंड महिलांच्या टीममधील तिसऱ्या वनडे मॅचमध्ये स्मृती मंधानाने एक अफलातून कॅच घेतला.

  • Published by:  Sunil Desale

इंग्लंड, 3 जुलै : भारतीय महिलांची क्रिकेट टीम इंग्लंड दौऱ्यावर (India Women team on England Tour) आहे. दोन्ही टीम्समध्ये तिसरी वन-डे मॅच (India Women vs England Women 3rd ODI) सुरू आहे. तिसऱ्या वन-डे मॅचमध्ये इंग्लंडच्या टीमने प्रथम बॅटिंग करत 219 रन्स केल्या. यामध्ये नताली सायवरने 49 रन्सची इनिंग खेळली आणि हिथर नाइटने 46 रन्सची इनिंग खेळली. या व्यतिरिक्त लॉरेन विनफील्डने 36 रन्स केल्या. या मॅचमध्ये भारतीय महिला बॉलर्सने उत्कृष्ट कामगिरी दाखवली त्यासोबतच स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) एक जबरदस्त कॅच पकडला.

स्मृती मंधानाने हवेत झेप घेत अफलातून कॅच पकडला आणि सर्वांनाच चकीत केले. मंधानाने नताली सायवरला कॅच आऊट करत हाफ सेंच्युरी बनवण्यापासून रोखले. स्मृती मंधानाने घेतलेल्या या कॅचचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

या मॅचमध्ये भारतीच महिलांच्या टीमकडून झूलन गोस्वामी, शिखा पांडे, पूनम यादव आणि स्नेह राणा यांच्यासोबतच हरमनप्रीत कौरने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. तर दिप्ती शर्माने जबरदस्त बॉलिंगचे प्रदर्शन दाखवत 3 विकेट्स घेतल्या.

नताली सायवरची कॅच स्मृती मंधानाने हवेत उडी घेत पकडली आणि सर्वांनाच अचंबित केले. इतकेच नाही तर इंग्लंडच्या टीमलाही ही कॅच पकडल्याचे पाहून धक्का बसला. नताली सायवरला दिप्ती शर्माने आऊट करत माघारी धाडले.

स्पिनर दिप्ती शर्माच्या बॉलिंगवर नताली सायवरने पुढे येत जोरदार शॉट खेळला आणि बॉल हवेत उडाला. यावेळी स्मृती मंधानाने डीप स्वायर लेगच्या दिनेशने धाव घेत हवेत झेप घेतली आणि कॅच पकडला.

First published:

Tags: India, Sports