Home /News /sport /

IND vs WI : 5 वर्षांनी कमबॅक, एकाच सीरिजनंतर अश्विन टीमबाहेर का? पाहा Inside Story

IND vs WI : 5 वर्षांनी कमबॅक, एकाच सीरिजनंतर अश्विन टीमबाहेर का? पाहा Inside Story

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 सीरिजसाठी टीम इंडियाची (India vs West Indies) निवड करण्यात आली आहे. दोन्ही फॉरमॅटसाठी ऑफ स्पिनर आर. अश्विनची (R Ashwin) निवड करण्यात आलेली नाही.

    मुंबई, 27 जानेवारी : वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 सीरिजसाठी टीम इंडियाची (India vs West Indies) निवड करण्यात आली आहे. दोन्ही फॉरमॅटसाठी ऑफ स्पिनर आर. अश्विनची (R Ashwin) निवड करण्यात आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अश्विन 5 वर्षांमध्ये पहिल्यांदाच वनडे खेळला. 2021 साली झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये अश्विनची 2017 नंतर पहिल्यांदाच टी-20 टीममध्ये निवड झाली होती. आयपीएलमधली कामगिरी आणि अनुभवी स्पिनर नसल्यामुळ अश्विनने टीम इंडियात पुनरागमन केलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या वनडे सीरिजमध्ये अश्विनला प्रभाव पाडता आला नाही. या सीरिजमध्ये टीम इंडियाचा 3-0 ने पराभव झाला. यानंतर लगेचच वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजसाठी अश्विन टीमबाहेर झाला. सुरूवातीला अश्विनला बाहेर करण्याचं कारण समोर आलं नव्हतं, पण आता याबाबत माहिती मिळाली आहे. बीसीसीआयने (BCCI) अश्विनला टीमबाहेर का केलं? याचं कारण सांगितलं नसलं तरी टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार दुखापतीमुळे अश्विनला काही काळ बाहेर राहावं लागू शकतं. दक्षिण आफ्रिकेत वनडे सीरिज खेळताना आर.अश्विनच्या मनगट आणि पायाच्या घोट्याला दुखापत झाली आहे. या दुखापतीतून बरं व्हायला अश्विनला वेळ लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊनमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडेमध्ये अश्विनच्या पायाचा घोटा वाकडा झाला आणि तो मनगटावर पडला, यात त्याला दुखापत झाली. अश्विनची दुखापत अजून किती गंभीर आहे, ते कळू शकलेलं नाही, पण अश्विनचं महत्त्व लक्षात घेता, निवड समितीला कोणताही धोका पत्करायचा नव्हता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजसाठी अश्विनऐवजी कुलदीप यादवचं टीम इंडियात पुनरागमन झालं, तर रवी बिष्णोईची पहिल्यांदाच निवड झाली. याशिवाय युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोन्ही स्पिनर खेळणार आहे. दुखापतीनंतर फिट झालेला अक्षर पटेलही वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणार आहे. भारताची टी-20 टीम रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिष्णोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल वनडे टीम रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: R ashwin, Team india

    पुढील बातम्या