विराटला 'हे' पुस्तक वाचण्याचा सल्ला कोणी दिला? सोशल मीडियावर रंगली चर्चा

विराटला 'हे' पुस्तक वाचण्याचा सल्ला कोणी दिला? सोशल मीडियावर रंगली चर्चा

विंडीजविरुद्धच्या कसोटीवेळी भारताचा कर्णधार विराट कोहली ड्रेसिंग रुमच्या बाल्कनीत पुस्तक वाचत बसलेला फोटो व्हायरल झाला आहे.

  • Share this:

अँटिगुआ, 24 ऑगस्ट : भारताचा कर्णधार विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकापाठोपाठ एक विक्रम मोडत आहे. आता सध्या त्याची एका वेगळ्याच कारणानं चर्चा होत आहे. विराट कोहली पहिल्यांदा पुस्तक वाचण्यावरून चर्चेत आला आहे. विंडीजविरुद्ध अँटिगुआ कसोटीत सामन्यावेळी ड्रेसिंगरुममध्ये विराट Detox Your Ego हे पुस्तक वाचताना दिसला. त्यानंतर विराटला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं

भारतीय संघ फलंदाजी करत असताना विराट कोहली ड्रेसिंग रुमच्या बाल्कनीत पुस्तक वाचत बसला होता. हा फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काही चाहत्यांनी म्हटलं आहे की, विराटसाठी हे योग्य पुस्तक आहे. एका युजरनं विराटला हे पुस्तक वाचण्याचा सल्ला कोणी दिला असाही प्रश्न विचारला आहे.

अँटिगुआ कसोटीतील दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव 297 धावांवर आटोपला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल खेळणाऱ्या विंडीजचा डाव गडगडला. त्यांना दिवस अखेर 8 बाद 189 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडं 108 धावांची आघाडी आहे. भारताकडून इशांत शर्माने 42 धावांत 5 गडी बाद केले.

VIDEO: माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचा 1952 ते 2019 जीवनप्रवास

Published by: Renuka Dhaybar
First published: August 24, 2019, 2:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading