मतभेदाच्या चर्चेनंतर पहिल्यांदाच विराटने शेअर केला रोहितसोबतचा फोटो, पण...

मतभेदाच्या चर्चेनंतर पहिल्यांदाच विराटने शेअर केला रोहितसोबतचा फोटो, पण...

वर्ल्ड कपमधील पराभवानंतर विराट-रोहित यांच्यात मतभेद असल्याची चर्चा रंगली होती.

  • Share this:

अँटिगुआ, 21 ऑगस्ट : वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभवानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात मतभेद सुरू झाल्याची चर्चा रंगली होती. विंडीज दौऱ्यावर जाण्यापूर्वी कोहलीने मतभेदाच्या चर्चांना फेटाळून लावलं होतं. मात्र तरीही दोघांमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याचंच दिसत होतं. सोशल मीडियावर रोहितनं विराटला अनफॉलो केल्याची चर्चा होती. तर विराटनं टाकलेल्या फोटोत रोहित नसायचा. यामुळं पुन्हा पुन्हा दोघांमध्ये मतभेद असल्याचंच म्हटलं जात होतं.

महिन्याभरापासून दोघांमधील मतभेदांच्या चर्चेनंतर दोघे मैदानाबाहेर एकत्र दिसले आहेत. कोहलीनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेपुर्वी विराट आणि रोहित एकत्र दिसले. अँटिगुआतील सामन्यापूर्वी जॉली बीचवर पार्टीतील फोटो विराटनं शेअर केला आहे. यामध्ये विराट आणि रोहित दोघेही दिसत आहेत. यापूर्वी विराटनं शेअर केलेल्या फोटोत रोहित नव्हता तेव्हा चाहत्यांनी काही बिनसलं आहे का असा प्रश्न विचारला होता.

आता विराटने रोहित फोटोमध्ये असलेला फोटो शेअर केला आहे. यानंतरही दोघांमध्ये मतभेद असल्याचंच म्हटलं जात आहे. दोघे एका फोटोत असले तरी विराट सर्वांच्या मधोमध असून रोहित शर्मा एका बाजूला आहे. त्याच्या शेजारी अजिंक्य रहाणे उभा आहे. या फोटोत केएल राहुल, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, मयंक अग्रवाल हेसुद्धा आहेत.

वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा रोहित शर्मा विंडीजविरुद्द टी20 आणि एकदिवसीय मालिकेत मात्र अपयशी ठरला. दुसऱीकडे विराट कोहली मात्र तुफान फॉर्ममध्ये आहे. त्यानं सलग दोन शतकं केली. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने टी20 आणि एकदिवसीय मालिका जिंकली आहे.

ईडीकडून चिदंबरम यांना लुक आऊट नोटीस, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

Published by: Suraj Yadav
First published: August 21, 2019, 1:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading