कसोटीत सर्वात यशस्वी कर्णधार झाला विराट, धोनीला मागे टाकल्यानंतर म्हणाला...

कसोटीत सर्वात यशस्वी कर्णधार झाला विराट, धोनीला मागे टाकल्यानंतर म्हणाला...

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं 28 कसोटी जिंकल्या असून त्याने महेंद्रसिंग धोनीला मागे टाकलं. धोनी कर्णधार असताना भारतानं 27 कसोटीत विजय मिळवला होता.

  • Share this:

जमैका, 03 सप्टेंबर : विराटच्या नेतृत्वाखाली भारतानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजयी सुरूवात केली आहे. विंडीजविरुद्धची दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप करत विराट भारताचा सर्वाधिक कसोटी जिंकणारा कर्णधार ठरला आहे. या विजयानंतर विराट म्हणाला की, हे संघाचं यश आहे. सर्वांच्या प्रयत्नामुळं भारतानं विजय मिळवला असून कर्णधारपद फक्त तुमच्या नावासमोर सी लावते.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा हा 28 वा विजय आहे. यामध्ये त्यानं भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकलं आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं 27 कसोटी जिंकल्या होत्या. कर्णधार विराट कोहली म्हणाला की, नेतृत्व करताना नावापुढं फक्त सी लागतं. या कामगिरीचं श्रेय संपूर्ण संघाचं आहे. तसेच विंडीजच्या संघाला त्यांना कोणत्या गोष्टीत सुधारणा करावी लागेल हे समजेल असंही विराट म्हणाला.

विंडीजचा संघ पराभूत झाला असला तरी त्यांची गोलंदाजी जबरदस्त आहे. केमार रोच आणि जेसन होल्डल यांनी मालिकेत चांगली कामगिरी केली. विराट म्हणाला की, जर त्यांच्या फलंदाजांनी धावा केल्या तर विंडीज सर्वात धोकादायक प्रतिस्पर्धी ठरेल.

भारतानं विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 318 धावांनी आणि दुसऱ्या डावात 257 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये एकूण 120 गुण झाले आहेत. या जोरावर भारतीय संघ टॉपला पोहचली आहे. भारताचा विंडीज दौरा संपला असून आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लढणार आहे. टी20 आणि कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर येणार असून 15 सप्टेंबरपासून हा दौरा सुरू होणार आहे.

VIDEO: उरणच्या ओएनजीसी प्लांटमध्ये भीषण अग्नितांडव! नागरिकांमध्ये भीती

Published by: Suraj Yadav
First published: September 3, 2019, 8:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading