विंडीज दौरा संपताना विराटच्या कामगिरीवर पडला डाग!

विंडीज दौरा संपताना विराटच्या कामगिरीवर पडला डाग!

विंडीजविरुद्धची मालिका जिंकण्यासाठी भारताला 8 विकेटची गरज आहे. या कसोटीत विजय मिळवल्यास विराट कोहली कसोटीत सर्वाधिक सामने जिंकून देणारा कर्णधार ठरणार आहे.

  • Share this:

जमैका, 02 सप्टेंबर : विंडीजविरुद्धची टी 20 आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर भारत आता कसोटी मालिका विजयाच्या दिशेनं वाटचाल करत आहे. दरम्यान, विंडीज दौऱ्याच्या शेवटी भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर एक नकोसा विक्रम जमा झाला आहे. विंडीजिविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात तो शून्यावर बाद झाला. त्याला केमार रोचनं पहिल्याच चेंडूवर बाद केलं. त्याआधी केमार रोचनं केएल राहुलला बाद केलं होतं.

केमार रोचनं सलग दोन एकसारखे चेंडू टाकत दोघांनाही बाद केलं. मात्र तिसऱ्या चेंडूवर अजिंक्य रहाणेला बाद करू शकला नाही. केमार रोचनं कसोटी क्रिकेटमध्ये 193 विकेट घेतल्या असून विंडिजकडून सर्वाधिक कसोटी बळी घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली चौथ्यांदा कसोटीमध्ये पहिल्याच चेंडूवर बाद झाला आहे. पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2011 मध्ये त्यानंतर 2014 आणि 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध विराट गोल्डन डक बाद झाला होता.

कसोटी क्रिकेटमध्ये आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असेलेला विराट कोहली आतापर्यंत नऊ वेळा शून्यावर बाद झाला आहे. विराट कोहलीनं विंडीजविरुद्धच्या कसोटीत मालिकाते 34 च्या सरासरीनं 136 धावा केल्या आहेत. मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो तिसऱ्या स्थानी आहे.

रविवारचा दिवस हा क्रिकेटच्या इतिहासात अनेकांना शून्यावर बाद करणारा ठरला. या एका दिवसात सहा फलंदाज शून्यावर बाद झाले. यामध्ये न्यूझीलंडचा कुलिन मुन्रो, भारताची स्मृती मानधना यांच्याशिवाय सोफिया लूफ, लूसी हिग्हम आणि ख्रिस्टी जॉर्डन यांचा समावेश आहे.

VIDEO: डान्सचा जलवा चाहत्यांच्या शिट्ट्या; हिला म्हणतात पाकची सपना चौधरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Sep 2, 2019 12:27 PM IST

ताज्या बातम्या