गेलच्या जागी 'वजनदार' खेळाडू विंडीजच्या संघात, भारताविरुद्ध करणार पदार्पण!

गेलच्या जागी 'वजनदार' खेळाडू विंडीजच्या संघात, भारताविरुद्ध करणार पदार्पण!

भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यासाठी वेस्ट इंडीजने संघ जाहीर केला आहे. यामध्ये गेलच्या जागी राहकिम कार्नवॉलला संधी देण्यात आली आहे.

  • Share this:

गयाना, 10 ऑगस्ट : भारत आणि विंडीज यांच्यातील टी20 मालिका भारतानं 3-0 ने जिंकली. त्यानंतर एकदिवसीय मालिकेला सुरूवात झाली आहे. यातील पहिला सामना पावसानं रद्द झाला. एकदिवसीय मालिकेनंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. यासाठी विंडीजनं 13 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. या संघातून विंडीजने स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला वगळलं आहे. संघात राहकिम कार्नवॉलला संधी दिली आहे.

22 ऑगस्टला कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतून राहकिम पदार्पण करणार आहे. सध्या त्याची जोरदार चर्चा होत आहे. विंडीजचा कर्णधार जेसन हा साडेसहा फूट उंचीचा आहे. त्याच्याशिवाय विंडीजचे बरेच खेळाडू सहा फूट उंचीचे आहेत. त्यामध्ये आता कार्नवॉलची भर पडली आहे. 26 वर्षीय कार्नवॉल साडेसहा फूट उंचीचा असून त्याचे वजन 140 किलो आहे. एकीकडे खेळाडूंच्या फिटनेस टेस्ट घेतल्या जात असताना त्याच्या या वजनदार शरिरयष्टीनंतरही संघात स्थान मिळाल्यानं वेगळीच चर्चा रंगली आहे.

अँटिगुवा इथं जन्मलेला कार्नवॉलने घरेलू क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. तंदुरुस्त नसल्यानं त्याला आतापर्यंत संघात स्थान मिळालं नव्हतं. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी कार्नवॉलची निवड झाली आहे. फलंदाजीसह फिरकीपटू म्हणून त्याला संघात स्थान मिळालं आहे.

कार्नवॉलने 55 प्रथम श्रेणी सामन्यात 97 डावांमध्ये 2 हजार 224 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 1 शतकाचा आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. कार्नवॉल वजनदार शरिरयष्टीचा दिसत असला तरीही क्षेत्ररक्षणात तो चपळ आहे. त्यानं 54 झेल घेतले आहेत. त्याशिवाय गोलंदाजीत त्यानं 260 विकेट घेतल्या आहेत. 2016 मध्ये झालेल्या दौऱ्यात वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाच्या इलेव्हन संघाकडून खेळताना त्यानं विराट कोहली, चेतेश्वर पुजारा यांना बाद केलं होतं.

घर की तलाव कळेना, कोल्हापुरातल्या गावातील पुराची भीषणता दाखवणारा ग्राऊंड REPORT

Published by: Suraj Yadav
First published: August 10, 2019, 3:40 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading