विराटला रोहितचं टेन्शन, विंडीजविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी?

विराटला रोहितचं टेन्शन, विंडीजविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी?

विंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला 22 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

  • Share this:

अँटिगुआ, 21 ऑगस्ट : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दोन कसोटींच्या मालिकेला 22 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील दोन्ही संघांचा पहिला सामना असणार आहे. या सामन्यात भारतासमोर प्लेइंग इलेव्हनची निवड करण्याचं आव्हान असेल. भारतीय संघ तब्बल सात महिन्यांनी कसोटी खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यामध्ये भारतासमोर मोठा प्रश्न आहे की, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या दोघांपैकी कोणाला संघात घ्यायचं? किंवा प्लेइंग इलेव्हनमध्ये पाच गोलंदाज खेळवण्याचा विचारही भारत करू शकतो.

भारतीय संघ जर चार गोलंदाजांसह उतरला तर रोहित आणि रहाणेला संघात स्थान मिळू शकते. मात्र पाच गोलंदाजांसह उतरायचं म्हटलं रोहित किंवा रहाणे यांच्यापैकी एकाला बाहेर बसावं लागेल. संघासाठी हा निर्णय सोपा असणार नाही. विंडीजविरुद्ध मयंक अग्रवाल आणि केएल राहुल सलामीला उतरू शकतात.

केएल राहुल फॉर्ममध्ये नसल्यानं त्याला गेल्या दोन कसोटी सामन्यात संघातून बाहेर बसवण्यात आलं होतं. त्याच्या जागी हनुमा विहारीला सलामीला पाठवण्यात आलं होतं. अजिंक्य रहाणे सराव सामन्यात फक्त एक धाव काढून बाद झाला. रहाणेला गेल्या दोन वर्षांत शतक करता आलेलं नाही. त्यानं 2017 मध्ये लंकेविरुद्ध शतक केलं होतं.

रोहित शर्माने गेल्या कसोटी सामन्यात आणि सराव सामन्यातसुद्धा अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळं संघ व्यवस्थापन त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्याची शक्यता नाकारता येणार नाही. दरम्यान रविंद्र जडेजाला अष्टपैलू खेळाडू म्हणून संधी दिली जाऊ शकते. त्याशिवाय आर अश्विनला कुलदीप यादवच्या जागी संघात स्थान मिळू शकेल. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांच्या खांद्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा असणार आहे.

VIDEO: मुंबईत माथाडी कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 21, 2019 11:41 AM IST

ताज्या बातम्या