Home /News /sport /

IND vs WI : वेस्ट इंडिज सीरिजसाठी टीम इंडियात मोठे बदल, दिग्गजांना डच्चू मिळणार!

IND vs WI : वेस्ट इंडिज सीरिजसाठी टीम इंडियात मोठे बदल, दिग्गजांना डच्चू मिळणार!

दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये टीम इंडियाची (India vs South Africa) कामगिरी निराशाजनक झाली. टेस्ट सीरिजमध्ये टीमचा 2-1 ने तर वनडे सीरिजमध्ये 3-0 ने पराभव झाला. यानंतर आता वेस्ट इंडिजची टीम भारत दौऱ्यावर (India vs West Indies) येणार आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 25 जानेवारी : दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये टीम इंडियाची (India vs South Africa) कामगिरी निराशाजनक झाली. टेस्ट सीरिजमध्ये टीमचा 2-1 ने तर वनडे सीरिजमध्ये 3-0 ने पराभव झाला. यानंतर आता वेस्ट इंडिजची टीम भारत दौऱ्यावर (India vs West Indies) येणार आहे. या दौऱ्यात 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सीरिजसाठी टीम इंडियात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 6 फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या सीरिजसाठी भारतीय टीममध्ये मोठे बदल व्हायची शक्यता आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकला नव्हता. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजसाठी रोहितचं टीममध्ये पुनरागमन होईल. रोहित शर्माच्याच नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरेल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलेला केएल राहुल (KL Rahul) पुन्हा एकदा मधल्या फळीत दिसू शकतो. रोहित अजून फिट झाला का नाही, याबाबत एनसीएने काहीही रिपोर्ट दिलेला नाही, पण फिट होण्यासाठी त्याने कठोर मेहनत घेतली आहे. टीमसाठी रोहितचं पुनरागमन महत्त्वाचं आहे, असं बीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्यांनी सांगितलं. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टेस्ट आणि वनडे सीरिज खेळलेल्या जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन्ही सीरिजसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये विश्रांती मिळालेल्या मोहम्मद शमीची (Mohammad Shami) टीम इंडियात निवड होईल, हे निश्चित मानलं जातंय. आयपीएल आणि टी-20 वर्ल्ड कप असल्यामुळे खेळाडूंचा शारिरिक ताण पाहणंही गरजेचं आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये बुमराहने सर्वाधिक बॉलिंग केली, त्यामुळे त्याला आराम गरजेचा आहे, असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भुवनेश्वर कुमारची (Bhuvneshwar Kumar) कामगिरी निराशाजनक झाली, त्यामुळे त्याला डच्चू मिळेल. तर टेस्ट आणि वनडे सीरिज खेळलेल्या शार्दुल ठाकूरलाही विश्रांती दिली जाऊ शकते. हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजा हे अजूनही फिट झालेले नाहीत, त्यामुळे तेदेखील निवडीसाठी उपलब्ध नसतील. तर वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांचंही पुनरागमन व्हायची शक्यता आहे. वेस्ट इंडिज सीरिजच्या तीन वनडे अहमदाबादमध्ये तर तीन टी-20 कोलकात्यामध्ये होणार आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Team india, West indies

    पुढील बातम्या