S M L

IND vs WI : खराब सुरुवातीनंतर वेस्ट इंडिजचा डाव सावरला

पहिल्या कसोटीतील मानहानीकारक पराभवानंतर या सामन्यात चांगली सुरुवात करण्याचं मोठं आव्हान वेस्ट इंडिजच्या संघासमोर होतं.

Updated On: Oct 12, 2018 06:00 PM IST

IND vs WI : खराब सुरुवातीनंतर वेस्ट इंडिजचा डाव सावरला

हैद्राबाद, 12 ऑक्टोबर : दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर वेस्ट इंडिजने ७ बाद २९५ धावा केल्या आहेत. रोस्टन चेज ९८ तर देवेंद्र बिशू २ धावांवर खेळत आहेत. भारताकडून कुलदीप यादव आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर आर अश्विनने एका फलंदाजाला माघारी धाडलं.

खराब सुरुवातीनंतर रोस्टन चेज आणि कर्णधार जेसन होल्डरने १०४ धावांची भागीदारी करत वेस्ट इंडिजचा डाव सावरला.

दरम्यान, त्याआधी भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत वेस्ट इंडिजची अर्धी टीम स्वस्तात माघारी धाडली. त्यामुळे कॅरेबियन टीमची अवस्था ५ बाद ११३ अशी झाली होती. यानंतर पहिल्याच दिवशी वेस्ट इंडिजचा पहिला डाव आटोपतोय की काय, अशी शक्यता तयार झाली. पण रोस्टन चेजने तळाच्या फलंदाजांना हाताशी धरत वेस्ट इंडिजचा डाव सावरला.लंचपूर्वी काय झालं?

भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत वेस्ट इंडिजच्या 4 फलंदाजांना माघारी धाडलं. कुलदीप यादवने दोन तर आर. अश्विन, उमेश यादव प्रत्येकी एक एक विकेट मिळवत सामन्याच्या सुरुवातीलाच भारताची पकड घट्ट केली. पण आपली पहिलीच कसोटी खेळत असलेला वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर दुखापतग्रस्त झाल्याने त्याला मैदानाबाहेर जावं लागलं.

दरम्यान, कॅरेबियन कर्णधार जेसन होल्डरने सकाळी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या कसोटीतील मानहानीकारक पराभवानंतर या सामन्यात चांगली सुरुवात करण्याचं मोठं आव्हान वेस्ट इंडिजच्या संघासमोर होतं.

Loading...
Loading...

भारताचा अनुभवी गोलंदाज आर अश्विनने किरन पोवेलला माघारी धाडत वेस्ट इंडिजला पहिला झटका दिला. त्यानंतर कुलदीप दोन आणि उमेशनेही एक विकेट मिळवत वेस्ट इंडिजला धक्का दिला. आता मोठी भागिदारी करत पुन्हा एकदा सामन्यात परतण्याचं मोठं आव्हान वेस्ट इंडिजच्या संघासमोर आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला लोळवत एक डाव आणि २७२ धावांनी विजय मिळवला होता. आजचा दुसरा आणि अंतिम कसोटी सामना जिंकत मालिकेत विजय मिळवण्याचा भारताचा इरादा असणार आहे.

VIDEO : पृथ्वी शॉने यासाठी घेतली रवी शास्त्रीची मदत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 12, 2018 12:35 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close