Home /News /sport /

दोन खेळाडूंनी कमी केलं सगळ्यात मोठं टेन्शन, T20 World Cup आधी टीम इंडिया आणखी मजबूत!

दोन खेळाडूंनी कमी केलं सगळ्यात मोठं टेन्शन, T20 World Cup आधी टीम इंडिया आणखी मजबूत!

टीम इंडियाने वेस्ट इंडिजला वनडेनंतर टी-20 सीरिजमध्येही (India vs West Indies T20) व्हाईटवॉश केलं. कोलकात्यामध्ये झालेल्या अखेरच्या टी-20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 17 रनने पराभव केला. या विजयासह टीम इंडियाचं मोठं टेन्शनही दूर झालं. स्वत: कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सीरिज जिंकल्यानंतर याबाबत सांगितलं.

पुढे वाचा ...
    मुंबई, 21 फेब्रुवारी : टीम इंडियाने वेस्ट इंडिजला वनडेनंतर टी-20 सीरिजमध्येही (India vs West Indies T20) व्हाईटवॉश केलं. कोलकात्यामध्ये झालेल्या अखेरच्या टी-20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 17 रनने पराभव केला, या विजयासह टीम इंडिया टी-20 फॉरमॅटमध्ये 6 वर्षांनी पहिल्या क्रमांकावर पोहोचली. या विजयासह टीम इंडियाचं मोठं टेन्शनही दूर झालं. स्वत: कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सीरिज जिंकल्यानंतर याबाबत सांगितलं. आमची मिडल ऑर्डर अजून नवीन आहे. आम्हाला कमजोरी दूर करायची होती. या सीरिजमुळे आनंदी आहे. आम्हाला जे पाहिजे आहे, ते बहुतेक मिळालं आहे, अशी प्रतिक्रिया रोहित शर्माने दिली. रोहित शर्माचं हे वक्तव्य टीमसाठी सगळ्यात मोठी अडचण ठरलेल्या मिडल ऑर्डरबाबत होतं. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपआधी भारताचं हे टेन्शन दूर झालं आहे. यामध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) या दोन खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका निभावली. मागच्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत सूर्यकुमार यादव टीम इंडियामध्ये जागा मिळवण्याची वाट पाहत होता. आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये बऱ्याच रन करूनही सूर्याची टीम इंडियात निवड होत नव्हती. तरीही निराश न होता त्याने डोकं शांत ठेवलं आणि आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत केलं. याचा फायदा सूर्याला लवकरच झाला, कारण त्याची टीम इंडियात निवड झाली. सूर्यकुमारने जोफ्रा आर्चरच्या बॉलिंगवर सिक्स मारत आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटची धमाकेदार सुरूवात केली. टीम इंडियात संधी मिळाल्यानंतर सूर्यकुमार यादवने मागे वळून बघितलं नाही. श्रेयस अय्यरसाठी मिडल ऑर्डरमधला बॅक अप म्हणून सुरूवात करणाऱ्या सूर्याने काही काळातच टीम इंडियातलं आपलं स्थान निश्चित केलं. दबावात शांत खेळ दबावाच्या परिस्थितीमध्येही सूर्यकुमार यादव शांत आणि संयमी राहतो. रविवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये जेव्हा सूर्या बॅटिंगला उतरला तेव्हा भारताचा स्कोअर 11 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 66 रन होता. रोहित शर्मा 14 व्या ओव्हरला आऊट झाला, तरीही सूर्याच्या बॅटिंगवर याचा परिणाम झाला नाही. त्याने मोठे शॉट मारले आणि अनुभवी खेळाडूप्रमाणे इनिंग सांभाळली. सूर्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन टी-20 मॅचमध्ये 53 पेक्षा जास्तच्या सरासरीने 107 रन केले, यात त्याचा स्ट्राईक रेटही 200 च्या जवळपास होता. या कामगिरीबद्दल त्याला मॅन ऑफ द सीरिज देण्यात आलं. फिनिशरच्या भूमिकेत व्यंकटेश सूर्यकुमारप्रमाणेच व्यंकटेश अय्यरनेही फिनिशर आणि सहावा बॉलर म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. आयपीएल 2021 च्या (IPL 2021) कामगिरीमुळे व्यंकटेश अय्यरची टीम इंडियात निवड झाली. केकेआरकडून (KKR) खेळताना ओपनिंग करणाऱ्या अय्यरने टीमला फायनलमध्ये पोहोचवलं. टी-20 वर्ल्ड कपमधल्या खराब कामगिरीनंतर हार्दिक पांड्या बाहेर गेला तेव्हा पर्याय म्हणून व्यंकटेश अय्यरला संधी देण्यात आली. मिळालेल्या या संधीचा व्यंकटेश अय्यरने फायदा करून घेतला. आयपीएलमध्ये ओपनिंग करणाऱ्या अय्यरला टीम इंडियासाठी सहाव्या क्रमांकावर बॅटिंगची संधी मिळाली. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मॅचमधून व्यंकटेश अय्यरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पहिलाच बॉल व्यंकटेशने बाऊंड्रीच्या बाहेर पाठवला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिन्ही टी-20 मध्ये त्याने फिनिशरची भूमिका चोख पार पाडली. दुसऱ्या टी-20 मध्ये त्याने ऋषभ पंतसोबत 35 बॉलमध्ये 76 रनची पार्टनरशीप केली. अखेरच्या सामन्यात व्यंकटेशने 19 बॉलमध्ये नाबाद 35 रन ठोकले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजमध्ये व्यंकटेश अय्यरने 24 नाबाद, 33 आणि 35 नाबाद रनची खेळी केली. त्याने हे रन 180 च्या स्ट्राईक रेटने केले. तसंच सहावा बॉलर म्हणून त्याने सीरिजमध्ये 3 ओव्हर बॉलिंग केली आणि 2 विकेट मिळवल्या. व्यंकटेश अय्यरच्या या कामगिरीमुळे टीम इंडियासाठी हार्दिकचा पर्याय तयार झाल्याचं दिसत आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, Suryakumar yadav, T20 world cup, Team india, West indies

    पुढील बातम्या