विराटची रोहितशी बरोबरी तर विंडीजचा पराभवानंतरही विश्वविक्रम!

India vs West Indies : भारताने विंडीजविरुद्धची तीन सामन्यांची टी 20 मालिका 3-0 ने जिंकली आहे.

  • Share this:

विंडीजविरुद्धची तीन टी20 सामन्याची मालिका भारताने 3-0 ने जिंकली. शेवटच्या टी20 सामन्यात भारताने ऋषभ पंत आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 7 गडी राखून विंडीजला पराभूत केलं. विंडीजने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 146 धावा केल्या. हे आव्हान भारतानं 19.1 षटकांत पूर्ण केलं.

भारताचा युवा खेळाडू आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतने आतंरराष्ट्रीय टी20 मध्ये त्याचं दुसरं अर्धशतक केलं. तिसऱ्या सामन्यात 65 धावा करताना त्यानं भारताकडून टी 20 मध्ये यष्टीरक्षकाने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. पंतने धोनीला (56 धावा) मागं टाकलं.

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा 2 वर्षांनंतर पहिल्यांदा विंडीजविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला नाही.

भारताने चौथ्यांदा टी20 मध्ये 3-0 ने क्लीन स्वीप विजय मिळवला आहे. विराटच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच अशी कामगिरी केली आहे. याआधी धोनीने एकदा आणि रोहित शर्माने दोन वेळा अशी कामगिरी केली होती.

आतंरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजला 58 वा पराभव पत्करावा लागला. सर्वाधिक पराभवाच्या बाबतीत हा विश्वविक्रम ठरला आहे.

वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज पोलार्डनं 58 धावांची खेळी केली. त्यांनं तब्बल सात वर्षांनी अर्धशतक केलं. यापूर्वी 30 जून 2012 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक केलं होतं.

तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात राहुल चाहरनं पदार्पण केलं. भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 खेळणारा चाहर 81 वा खेळाडू आहे. तसेच पदार्पण करणारा चौथा युवा खेळाडू आहे.

शेवटच्या टी 20 सामन्यात कोहलीनं अर्धशतक केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके करण्याबाबत त्यानं रोहित शर्माशी बरोबरी केली. दोघांच्या नावावर प्रत्येकी 21 अर्धशतकं आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 06:43 PM IST

ताज्या बातम्या