टीम इंडियाचा पोरकटपणा, विंडीजविरुद्धच्या 4 चुका पडल्या महागात

टीम इंडियाचा पोरकटपणा, विंडीजविरुद्धच्या 4 चुका पडल्या महागात

विंडिजने दुसऱ्या टी20 सामन्यात भारतावर 9 चेंडू आणि 8 गडी राखून विजय मिळवला.

  • Share this:

तिरुवअनंतपुरम, 09 डिसेंबर : हैदराबादमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाला तिरुवनंतरपुरममध्ये मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं. विंडिजने दुसऱ्या सामन्यात भारतावर 9 चेंडू आणि 8 गडी राखून विजय मिळवला. विंडिजने चांगली कामगिरी केलीच पण भारताच्या चुका त्यांच्या पथ्यावर पडल्या.

भारताच्या पराभवाला फलंदाजांची सुमार कामगिरी जबाबदार ठरली. सलामीची जोडी पुन्हा एकदा अपयसी ठरली. केएल राहुल 11 धावांवर तर रोहित शर्मा 15 धावांवर बाद झाला. त्यानतंर भारताला वेगाने धावा करता आल्या नाहीत. मधल्या फळीत शिवम दुबेने 30 चेंडूत 54 धावांची फटकेबाजी करून धावगती वाढवली.

पुन्हा एकदा मधल्या फळीतील फलंदाजांची हाराकीरी झाली. 38 धावांत तीन फलंदाज बाद बाद झाले. जडेजा, पंत आणि श्रेयस अय्यर हे वेगाने धावा करू शकले नाहीत. त्यामुळे 190 पर्यंत धावा होतील असे चित्र असताना भारताला 170 धावांवर समाधान मानावे लागले.

भारताला खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसला. हैदराबादमध्येही ढिसाळ क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन टीम इंडियाने केले होते. तिरुवनंतपुरममध्ये तर यावर कडी केली. भुवनेश्वर कुमारच्या एकाच षटकात 2 झेल सुटले. पहिला झेल वॉशिंग्टन सुंदरने तर सिमन्सचा झेल सोडून मोठी चूक केली. त्यानेच विंडीजला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर एविस लुइसचा झेल पंतने सोडला. त्यानेही जीवदानाचा फायदा घेत 40 धावा फटकावल्या.

फलंदाजी, क्षेत्ररक्षकांच्या या चुका झाल्या असताना गोलंदाज तरी कसे मागे राहतील. त्यांनीही धावांची खैरात केली. दीपक चाहरने 35 तर भुवनेश्वर कुमारने 36 धावा केल्या. युझवेंद्र चहलला संथ खेळपट्टीचा फायदा घेता आला नाही. त्याने तर 3 षटकात 36 धावा दिल्या. जडेजानेदेखील 2 षटके गोलंदाजी करताना 22 धावा दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Dec 9, 2019 08:59 AM IST

ताज्या बातम्या