डेनिस लिलीपेक्षा 'हा' भारतीय गोलंदाज धोकादायक, विव रिचर्ड्स यांनी केलं कौतुक

डेनिस लिलीपेक्षा 'हा' भारतीय गोलंदाज धोकादायक, विव रिचर्ड्स यांनी केलं कौतुक

भारतीय संघ सध्या विंडीज दौऱ्यावर असून विव रिचर्ड्स यांनी भारताचा कर्णधार विराट कोहलीसह खेळाडूंचं कौतुक केलं.

  • Share this:

अँटिगुआ, 24 ऑगस्ट : विंडीजचे महान फलंदाज सर विव्हियन रिचर्ड्स यांनी भारतीय क्रिकेट संघात असा एक गोलंदाज आहे जो मला ऑस्ट्रेलियाच्या डेनिस लिलीपेक्षा धोकादायक वाटतो असं म्हटलं. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इतर गोलंदाजांपेक्षा वेगळा आहे असं रिचर्ड्स म्हणाले.

विव रिचर्ड्स यांनी बुमराहची तुलना त्यांच्या काळातील दिग्गज गोलंदाज डेनिस लिलीशी केली आहे. ते म्हणतात की बुमराहऐवजी मी डेनिस लिलीचा सामना करणं पसंत करेन. डेनिस लिलीपेक्षाही बुमराह धोकादायक असून जोपर्यंत तो तंदुरुस्त राहिल तोपर्यंत फलंदाजांना त्रास देईल असंही रिचर्ड्स म्हणाले.

डेनिस लिलिचा सामना करताना तो काय करत आहे हे पाहता याचचं पण बुमराहच्या गोलंदाजीचा अंदाज बांधणं कठीण असल्याचं रिचर्ड्स म्हणाले. त्यांनी भारताचा कर्णधार विराट कोहलीचं कौतुक केलं. विराट कोहलीला खेळताना पहायला आवडतं. विराटबद्दल माझ्या मनात आदर आहे. आम्ही दोघेही नेतृत्व आणि दृष्टीकोनाबाबत एकसारखे आहोत असंही रिचर्ड्स म्हणाले.

बुमराहनं विंडीजविरुद्धच्या सामन्यात एकच विकेट घेतली असली तरी त्यानं मोठा विक्रम मोडला आहे. बुमराह भारताकडून सर्वात कमी कसोटीत 50 विकेट घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्यानं व्यंकटेश प्रसाद आणि मोहम्मद शमी यांचा विक्रम मोडला. दोघांनी 13 कसोटीत ही कामगिरी केली होती.

VIDEO: भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली; दुर्घटनेची भीषण दृश्यं

Published by: Suraj Yadav
First published: August 24, 2019, 8:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading