वेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी

वेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी

कॅरेबियन संघाला कोणतीही मोठी भागीदारी करता आली नाही. परिणामी वेस्ट इंडिजची 6 बाद 76 धावा अशी केविलवाणी अवस्था झाली.

  • Share this:

हैद्राबाद, 14 ऑक्टोबर : दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसावरही भारतीय गोलंदाजांचं निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळालं. चहापानापर्यंत वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 6 बाद 76 धावा झाल्या आहेत.

वेगवान गोलंदाज उमेश यादवने पुन्हा एकदा भेदक मारा करत 3 कॅरेबियन फलंदाजांना माघारी धाडलं. उमेश यादवच्या या सामन्यात एकूण 9 विकेट्स झाल्या असून ही त्याची आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावाची अत्यंत खराब सुरुवात झाली. त्यांचे दोन्ही सलामीवीर खातं न उघडताच बाद झाले. त्यानंतर कॅरेबियन संघाला कोणतीही मोठी भागिदारी करता आली नाही.

परिणामी वेस्ट इंडिजची  6 बाद 76 धावा अशी केविलवाणी अवस्था झाली. भारताकडून उमेशने 3 तर आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवने प्रत्येकी एक विकेट मिळवली.

दरम्यान, भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर पहिल्या डावात 56 धावांनी आघाडी मिळवली होती. आता वेस्ट इंडिजला उरलेल्या फलंदाजांना बाद करून  लवकरात लवकर सामना जिंकण्याचा भारताचा इरादा असेल.

सकाळपासून काय घडलं?

वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात भारताने 367 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे भारताने वेस्ट इंडिजवर 56 धावांची आघाडी मिळवली.

भारताकडून डावखुरा फलंदाज ऋषभ पंतने 11 चौकार आणि 2 षटकारांसह सर्वाधिक 92 धावा केल्या. तर अनुभवी अजिंक्य रहाणेने 80 धावांची संयमी खेळी करत भारताच्या डावाला आकार दिला. मात्र या दोन्ही खेळाडूंनी शतक करण्याची संधी गमावली.

आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने कालच्या 4 बाद 308 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. वेस्ट इंडिजसमोर धावांचा डोंगर उभा करण्याची मोठी संधी भारतासमोर होती. कारण रहाणे आणि पंत या जोडीचा खेळपट्टीवर चांगला जम बसला होता. पण आज हे दोघेही खेळपट्टीवर फार काळ तग धरू शकले नाहीत.

अष्टपैलू जडेजाही खातं न उघडताच माघारी परतला. आर अश्विनने 35 धावांची निर्णायक खेळी केली.

 PHOTO : कॅप्टनकूल उद्योगाचं मैदानही गाजवतो, जाणून घ्या धोनीचे चार व्यवसाय

 

 

First published: October 14, 2018, 3:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading