Home /News /sport /

IND vs WI : आधी टीम इंडिया मग मुंबई इंडियन्स, रोहितचा फेवरेट खेळाडू अचानक गायब!

IND vs WI : आधी टीम इंडिया मग मुंबई इंडियन्स, रोहितचा फेवरेट खेळाडू अचानक गायब!

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 सीरिजसाठी टीम इंडियाची (India vs West Indies) घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडिया या दोन्ही सीरिज खेळणार आहे.

    मुंबई, 28 जानेवारी : वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 सीरिजसाठी टीम इंडियाची (India vs West Indies) घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडिया या दोन्ही सीरिज खेळणार आहे. अंडर-19 वर्ल्ड कप आणि आयपीएल गाजवलेल्या रवी बिष्णोई (Ravi Bishnoi) या लेग स्पिनरची टीम इंडियात पहिल्यांदाच निवड झाली आहे. भारतीय टीममध्ये निवड व्हायचं स्वप्न प्रत्येक जण पाहतो, तसंच रवी बिष्णोईनेही पाहिलं होतं. रवीचं हे स्वप्न आता सत्यात उतरलं आहे. रवीचं हे स्वप्न पूर्ण होत असलं तरी काही महिन्यांपूर्वी असाच एक लेग स्पिनर टीम इंडिया आणि निवड समितीच्या रणनितीचा भाग होता, पण तो अचानक गायब झाला. 2021 साली झालेल्या टी-20 वर्ल्ड कपसाठी युझवेंद्र चहलऐवजी (Yuzvendra Chahal) राहुल चहरची (Rahul Chahar) टीम इंडियात निवड झाली. वर्ल्ड कपमध्ये राहुल चहरला फक्त एकच मॅच खेळण्याची संधी मिळाली, यानंतर मात्र चहरची टीम इंडियात निवड झालेली नाही. फक्त एका खराब मॅचमुळे चहरला बाहेर कसं केलं गेलं? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राहुल चहरला मागच्या वर्षी श्रीलंकेत झालेल्या वनडे सीरिजमध्येही एकच मॅच खेळण्याची संधी मिळाली होती. या सामन्यात त्याने 3 विकेट घेतल्या होत्या. ही मॅच राहुलच्या करियरमधली पहिलीच वनडे होती. याशिवाय त्याने 6 टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 23.85 च्या सरासरीने 7 विकेट घेतल्या आहेत. राहुल चहरचं आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) केलेल्या धमाकेदार कामगिरीमुळे टीम इंडियात आगमन झालं, पण मुंबई इंडियन्सनेही राहुलला आयपीएल लिलावाआधी त्याला रिटेन न करता सोडून दिलं. राहुल चहर मुंबई इंडियन्स आणि टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा विश्वासू खेळाडू मानला जातो. राहुल चहरने मुंबई इंडियन्सना अनेकवेळा एकट्याच्या जीवावर मॅच जिंकून दिल्या आहेत. तरीही त्याच्यावर निवड समिती आणि रोहित शर्माने वेस्ट इंडिज सीरिजसाठी विश्वास दाखवला नाही. भारताची टी-20 टीम रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिष्णोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल वनडे टीम रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Mumbai Indians, Rohit sharma, Team india

    पुढील बातम्या