पंतने मोडला धोनीचा मोठा विक्रम, ऑस्ट्रेलियाच्या गिलख्रिस्टशी बरोबरी!

भारताचा युवा खेळाडू ऋषभ पंतवर सध्या त्याच्या फलंदाजीमुळं टीका केली जात आहे. तरीही त्यानं विंडीज दौऱ्यात अशी कामगिरी केली की दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2019 01:14 PM IST

पंतने मोडला धोनीचा मोठा विक्रम, ऑस्ट्रेलियाच्या गिलख्रिस्टशी बरोबरी!

भारताच्या विंडीज दौऱ्यावर यष्टीरक्षक ऋषभ पंतची फलंदाजी चिंतेचा विषय ठरत आहे. फलंदाजीतील सुमार कामगिरीमुळे त्याच्यावर टीकाही केली जात आहे. संयमानं फलंदाजी न करता बेजबाबदार फटके मारून तो बाद होतो. तरीही त्यानं भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीला मागे टाकलं आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज यष्टीरक्षक अॅडम गिलख्रिस्ट याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

भारतानं दुसऱ्या कोसटी सामन्यात तिसऱ्या दिवशी 299 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना भारतानं विंडिजसमोर 468 धावांचं आव्हान दिलं. विंडीजची दुसऱ्या डावात सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी 54 धावांत 2 गडी गमावले. क्रेग ब्रेथवेट इशांत शर्माच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतकडे झेल देऊन बाद झाला.

यष्टीरक्षण करताना पंतने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकलं. त्यानं भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 50 बळी घेण्याची कामगिरी केली. पंतने 11 कसोटीत यष्टीमागे 50 बळींचा टप्पा गाठला. तर धोनीला यासाठी 15 कसोटी खेळाव्या लागल्या होत्या.

विंडीज दौऱ्यात ऋषभ पंतला फलंदाजीत मात्र फारशी चमक दाखवता आली नाही. त्यानं दोन कसोटी सामन्यातील तीन डावात 58 धावा केल्या. यात त्यानं सर्वाधिक 27 धावा केल्या आहेत.

कसोटीत यष्टीमागे सर्वात वेगवान 50 बळी घेण्याची कामगिरीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाउचर, इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन पहिल्या क्रमांकावर आहेत. तिघांनीही 10 सामन्यात यष्टीमागे 50 बळी घेतले होते. तर ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्टनं 11 सामन्यात ही कामगिरी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Sep 2, 2019 01:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...