शास्त्रींनी शेअर केला बीचवरचा PHOTO, सोशल मीडियावर झाले जबरदस्त ट्रोल

शास्त्रींनी शेअर केला बीचवरचा PHOTO, सोशल मीडियावर झाले जबरदस्त ट्रोल

भारतीय संघानं चौथ्याच दिवशी विजय मिळवला. त्यानंतर एक दिवसाच्या मिळालेल्या सुट्टीचा आनंद बीचवर जाऊन साजरा केला.

  • Share this:

अँटिगुआ, 27 ऑगस्ट : विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं चौथ्या दिवशीच विजय मिळवला. त्यानंतर भारताच्या खेळाडूंसह प्रशिक्षकांनी एकदिवस जास्त मिळालेल्या सुटीचा आनंद घेतला. यावेळी मुख्य प्रशिक्षक पदी फेरनिवड़ झालेल्या रवी शास्त्री यांनी अँटिगुआ बीचवर काढलेला एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअऱ करताना त्यांनी हॉट हॉट हॉट, टाइम फॉर सम ज्यूस असं म्हटलं आहे. या फोटोवरून चाहत्यांनी मजेशीर कमेंट करण्यास सुरुवात केली आहे.

भारतानं वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजयी सुरुवात केली. भारतानं तब्बल 318 धावांनी यजमान वेस्ट इंडिजला त्यांचा घरच्या मैदानावर नमवलं. दरम्यान, दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. जसप्रीत बुमराहचा भेदक मारा आणि अजिंक्य रहाणेच्या दमदार फलंदाजीच्या जारोवर भारताने हा विजय मिळवला.

विंडीजविरुद्धची पहिली कसोटी भारताने चौथ्या दिवशी 318 धावांनी जिंकली. दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेनं शतक करून भारताला मोठी आघाड़ी मिळवून दिली. त्यानंतर जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीच्या जोरावर विंडीजला 100 धावांत गुंडाळलं.

बुमराहनं अवघ्या 7 धावांत 5 गडी बाद केले. त्याशिवाय पहिल्या डावात 5 विकेट घेणाऱ्या इशांत शर्मानं 31 धावा देत 3 गडी बाद केले. मोहम्मद शमीनं 2 गडी बाद केले. तत्पूर्वी, भारताने दुसरा डाव 7 बाद 343 धावांवर घोषित केला. दुसऱ्या डावात रहाणेनं 102 धावांची तर हनुमा विहारीनं 93 धावांची खेळी केली. त्यामुळं भारताला बलाढ्या आघाडी मिळाली. चहापर्यंतच वेस्ट इंडिजचा निम्मा संघ तंबूत परतला होता.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं 5 गडी बाद करून इतिहास रचला आहे. त्यानं फक्त 7 धावात 5 गडी बाद केले. यासह त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि विंडीज या देशांविरुद्ध एकाच डावात 5 गडी बाद करण्याची कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे. बुमराहनं 11 कसोटी सामने खेळले असून त्यानं या चारही देशांविरुद्धच्या पहिल्याच दौऱ्यात ही कामगिरी केली आहे.

VIDEO : धावत्या रिक्षातून विद्यार्थी फेकला गेला बाहेर, तोच उठून पळाला मागे

Published by: Suraj Yadav
First published: August 27, 2019, 12:31 PM IST

ताज्या बातम्या