टीम इंडियाला मोठा धक्का, टी20 जिंकली पण एकदिवसीय मालिकेआधी प्रमुख खेळाडू बाहेर!

टीम इंडियाला मोठा धक्का, टी20 जिंकली पण एकदिवसीय मालिकेआधी प्रमुख खेळाडू बाहेर!

भारतीय संघाने टी20 मालिका जिंकली असून आता एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी संघ सज्ज झाला आहे पण त्याआधीच एक प्रमुख खेळाडू बाहेर पडण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 डिसेंबर : विंडीजविरुद्धची टी20 मालिका 2-1 ने जिंकल्यानंतर भारतीय संघ आता एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाला आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. 15 डिसेंबरला पहिला सामना होणार असून त्याआधी एका प्रमुख खेळाडूला दुखापत झाली आहे. त्यामुळे एकदिवसीय मालिकेत खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा सांभाळणाऱ्या भुवनेश्वर कुमारला पुन्हा एकदा दुखापत झाली आहे. त्यामुळे भुवनेश्वरला आगामी एकदिवसीय मालिकेला मुकावे लागणार आहे. त्याच्या जागी नवदीप सैनीला संघात स्थान मिळू शकते. सैनीसुद्धा दुखापतीतून सावरला असून त्याने रणजीतून पुनरागमन केलं आहे.

याआधी ऑगस्ट महिन्यातही भुवनेश्वरला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो संघातून बाहेर होता. विंडीजविरुद्ध टी20 मालिकेत तो खेळला पण आता दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. अद्याप त्याच्या दुखापतीबद्दल संघ व्यवस्थापन किंवा बीसीसीआय़कडून सांगण्यात आलेलं नाही.

भुवनेश्वर संघात नसल्याने भारताच्या गोलंदाजीवर परिणाम होणार आहे. त्याच्या जागी नवदीपला जरी संधी दिली तरी त्याची कामगिरी फारशी समाधानकारक नाही. त्यापूर्वी विंडीजला टी20 मालिकेत 2-1 ने पराभूत केलं. यात पहिल्या सामन्यात भारताने तर दुसऱ्या सामन्यात विंडीजने बाजी मारली होती. अखेरच्या सामन्यात भारताने विजय मिळवून मालिका खिशात टाकली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2019 05:01 PM IST

ताज्या बातम्या