Home /News /sport /

IND vs WI : रोहित-धवनपेक्षाही आक्रमक तरी संधी नाही, 22 व्या वर्षीच खेळाडूचं करियर संकटात!

IND vs WI : रोहित-धवनपेक्षाही आक्रमक तरी संधी नाही, 22 व्या वर्षीच खेळाडूचं करियर संकटात!

भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातल्या 3 वनडे मॅचच्या सीरिजला 6 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. वनडे सीरिजनंतर 3 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे. या दोन्ही सीरिजसाठी टीम इंडियाची (Team India) निवड करण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 27 जानेवारी : भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातल्या 3 वनडे मॅचच्या सीरिजला 6 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. वनडे सीरिजनंतर 3 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे. या दोन्ही सीरिजसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या खराब कामगिरीनंतरही भारताच्या बॅटिंगमध्ये फार बदल करण्यात आलेले नाहीत, यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी केल्यानंतरही पृथ्वी शॉची (Prithvi Shaw) टीम इंडियात निवड न झाल्यामुळे टीम इंडियाच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वनडे सीरिजमध्ये (India vs South Africa) भारतीय बॅटिंग सुरूवातीपासूनच आक्रमण करत नसल्याचं प्रत्येक सामन्यात दिसून आलं, त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध आक्रमक ओपनिंग बॅटर असणाऱ्या शॉला संधी मिळेल असं बोललं जात होतं, पण शॉच्या पदरी पुन्हा निराशाच आली. 2018 साली पृथ्वी शॉने वेस्ट इंडिजविरुद्धच्याच टेस्टमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये शॉने आक्रमक शतक केलं, पण यानंतर तो फिटनेस आणि खराब फॉर्ममुळे फार खेळू शकला नाही. पृथ्वी शॉ भारताकडून शेवटची टेस्ट 2020 साली ऍडलेडमध्ये खेळला, त्या सामन्यात टीम इंडियाचा 36 रनवर ऑल आऊट झाला होता. याच सामन्यात पृथ्वी शॉच्या तंत्रावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि मग तो टीम इंडियातून बाहेर फेकला गेला. भारतीय टीम इंग्लंड दौऱ्यावर होती तेव्हा टीम इंडियाचे युवा खेळाडू श्रीलंका दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यातल्या वनडे आणि टी-20 सीरिजमध्ये पृथ्वी शॉला संधी देण्यात आली, पण नंतर पुन्हा एकदा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना पृथ्वी शॉने अनेकवेळा आक्रमक सुरूवात केली. पृथ्वी शॉची बॅटिंग बघून अनेकांना वीरेंद्र सेहवागच्या बॅटिंगचीही आठवण येते, असं असलं तरी पृथ्वी शॉसाठी सध्या टीम इंडियाचे दरवाजे बंदच आहेत. भारताची टी-20 टीम रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिष्णोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल वनडे टीम रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Prithvi Shaw, Team india, West indies

    पुढील बातम्या