सुपर कूल धोनीचा नवा लूक पाहिलात का?

सुपर कूल धोनीचा नवा लूक पाहिलात का?

धोनी इतर खेळाडूंच्याआधीच गुवाहाटीला पोहोचला. सामन्याआधी त्याने जोमात नेट प्रॅक्टीस केली

  • Share this:

गुवाहाटी, १९ ऑक्टोबर २०१८- इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिजच्या एकदिवसीय मालिकेला २१ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. २१ ऑक्टोबरला टीम इंडिया गुवाहाटीमध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे. कसोटी मालिका जिंकल्यानंतर आता वनडे मालिकेवरही आपलं नाव कोरण्याचा टीम इंडिया प्रयत्न करेल. याचसाठी टीम इंडियातील इतर खेळाडूंसह एमएस धोनीही नेट प्रॅक्टीसमध्ये घाम गाळताना दिसत आहे. वेस्ट इंडिज विरोधातील एकदिवसीय मालिकेत आणि टी- २० मालिकेत खेळणार आहे. धोनीने यावेळी आपला लूक थोडासा बदलला आहे. तो आता फ्रेंच बिअर्डमध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे त्याने त्याची पांढरी दाढी रंगवून काळी केली नाही. तो पांढऱ्या दाढीमध्येच दिसणार आहे. त्याच्या या लूकची खासियत म्हणजे फ्रेंच बिअर्डसोबत अनेकजण मिशीही ठेवतात. धोनीने मात्र मिशी ठेवलेली नाही.

धोनी इतर खेळाडूंच्याआधीच गुवाहाटीला पोहोचला. सामन्याआधी त्याने जोमात नेट प्रॅक्टीस केली. त्याने यावेळी फलंदाजीचा सराव करत हेलीकॉप्टर शॉटचाही सराव केला. विराट कोहलीच्या अंतर्गत टीम इंडिया चांगलं प्रदर्शन करताना दिसत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या मालिकेनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया टूरला जाणार आहे. ऑस्ट्रेलियामध्येही टीम इंडिया कसोटी, एकदिवसीय आणि टी- २० मालिका खेळणार आहे. या दौऱ्यानंतर टीम इंडिया न्युझीलँडच्या दौऱ्यासाठी रवाना होईल.

First Published: Oct 20, 2018 07:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading