पहिल्या सामन्याआधी अचानक डावललं, धोनीच्या नेतृत्वाखाली बदललं नशीब

पहिल्या सामन्याआधी अचानक डावललं, धोनीच्या नेतृत्वाखाली बदललं नशीब

इशांत शर्माने वेस्ट इंडीजविरुद्ध गोलंदाजीसह फलंदाजीतही जबरदस्त कामगिरी केली आहे. तो आशियाबाहेर सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज ठरला आहे.

  • Share this:

जमैका, 02 सप्टेंबर : भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मानं वेस्ट इंडीजमध्ये जबरदस्त कामगिरी केली असून आशियाबाहेर सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज ठरला आहे. इशांत शर्मा सोमवारी त्याचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. जगातील वेगवान गोलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या इशांत शर्मानं 2007 मध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनेकदा संघात आत-बाहेर राहिलेल्या इशांतला पदार्पणाच्या आधी अचानक संघातून डच्चू मिळाला होता.

वयाच्या 18 व्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी त्याची संघात निवड झाली होती. दौऱ्यावर जाण्याची तयारी पूर्ण झाली असताना त्याला ऐनवेळी डच्चू देण्यात आला. यानंतर काही महिन्यांनी मे 2007 मध्ये त्याला पदार्पणाची संधी मिळाली. संघात स्थान टिकवणं त्याच्यासाठी आव्हानात्मक होतं. पदार्पणानंतर तब्बल 7 वर्षांनी इशांत शर्माचं नशिब बदललं.

2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट आणि 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी 20 मध्ये पदार्पण केलं होतं. आयपीएलमध्येही त्याची कारकिर्द चढ-उतारांनी भरलेली होती. आता त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे.

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ गेला होता. यात लॉर्ड्सवर भारतानं 295 धावांची खेळी केली होती. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडने 319 धावा केल्या. तर भारतानं दुसऱ्या डावात 342 धावा करून इंग्लंडला 319 धावांचे आव्हान दिलं. यावेळी इशांत शर्मानं 74 धावांत 7 गडी बाद करून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या कामगिरीच्या जोरावर भारतानं सामना 95 धावांनी जिंकला होता.

लॉर्ड्सवर केलेल्या कामगिरीनंतर मात्र इशांत शर्माने संघात स्थान पक्कं केलं. कसोटीत स्थान निर्माण केलेल्या इशांत शर्मानं 2016मध्ये अखेरचा एकदिवसी सामना खेळला होता. तर ऑक्टोंबर 2013 मध्ये त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा टी 20 सामना खेळला होता.

VIDEO: डान्सचा जलवा चाहत्यांच्या शिट्ट्या; हिला म्हणतात पाकची सपना चौधरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 09:40 AM IST

ताज्या बातम्या