INDvsWI 2nd T20 : भारताचा विंडीजवर सलग दुसरा विजय, मालिका जिंकली

INDvsWI 2nd T20 : भारताचा विंडीजवर सलग दुसरा विजय, मालिका जिंकली

तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत भारतानं पहिले दोन सामने जिंकून भारताने विजयी आघाडी घेतली आहे.

  • Share this:

फ्लोरिडा, 05 ऑगस्ट :विंडीजविरुद्धच्या टी20 मालिकेत भारताने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत निर्णायक आघाड़ी घेतली आहे. तीन सामन्यापैकी भारताने दोन सामने जिंकून मालिका खिशात घातली. दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताने रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत 167 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना वेस्ट इंडीजने 15.3 षटकांत 4 बाद 98 धावा केल्या होत्या. त्यावेळी पावसाने सामन्यात व्यत्यय आला. अखेर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 22 धावांनी विजयी घोषित करण्यात आलं.

विंडीजच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर सुनील नारायण आणि एविन लुईस 8 धावांच्या आत बाद झाले. त्यानंतर निकोलस पूरन आणि रॉमन पॉवेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी 74 धावांची भागिदारी केली. कृणाल पांड्यानं ही भागिदारी तोडली. एकाच षटकात त्यानं या दोघांनाही बाद केलं.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा सलामीवीर रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 5 बाद 167 धावांपर्यंत मजल मारली. भारताचे सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी सहा षटकांत 50 धावांची भागिदारी केली. धवन बाद झाल्यानंतर रोहित शर्माने अर्धशतक केलं. धवन 23 धावांवर बाद झाला. त्यानंतर कोहली आणि रोहित शर्माने सघाचं शतक धावफलकावर लावलं. रोहित शर्मा 67 धावांवर बाद झाला.

ऋषभ पंत पुन्हा एकदा अपयशी ठरला. पहिल्या सामन्यात खातं न उघडणाऱ्या पंतने या सामन्यात 4 धावा केल्या. त्यानंतर कोहलीचा 23 धावांवर कॉट्रेलनं त्रिफळा उडवला. अखेरच्या षटकात कृणाल पांड्या आणि रविंद्र जडेजाने तीन षटकार मारून संघाच्या धावसंख्येत भर घातली. पांड्या 20 धावांवर तर जडेजा 9 धावांवर नाबाद राहिले.

विडींजविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने 4 गडी राखून विजय मिळवला. विंडीजने दिलेलं 96 धावांचं आव्हान भारताने 17.2 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. विंडीजला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 बाद 95 धावा करता आल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारतीय फलंदाजसुद्धा धडपडत होते.

SPECIAL REPORT: भारतीय जवानांनी पाकचे दात घशात घातले, दहशतवाद्यांसह बॅटच्या 7 कमांडोंचा खात्मा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 5, 2019 08:42 AM IST

ताज्या बातम्या