Home /News /sport /

IND vs WI : रोहित-द्रविडच्या एण्ट्रीनंतर या 8 खेळाडूंना भीती, पुन्हा टीम इंडियात जागा नाही!

IND vs WI : रोहित-द्रविडच्या एण्ट्रीनंतर या 8 खेळाडूंना भीती, पुन्हा टीम इंडियात जागा नाही!

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 साठी टीम इंडियाची (India vs West Indies) निवड करण्यात आली. दक्षिण आफ्रिका सीरिजमधल्या खराब कामगिरीनंतर टीम इंडियामध्ये मोठे बदल होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, पण निवड समितीने जुन्या खेळाडूंवरच जास्त विश्वास दाखवला.

पुढे वाचा ...
    मुंबई, 28 जानेवारी : वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 साठी टीम इंडियाची (India vs West Indies) निवड करण्यात आली. दक्षिण आफ्रिका सीरिजमधल्या खराब कामगिरीनंतर टीम इंडियामध्ये मोठे बदल होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, पण निवड समितीने जुन्या खेळाडूंवरच जास्त विश्वास दाखवला. मागच्या वर्षी म्हणजेच 2021 साली टीम इंडियात बऱ्याच युवा खेळाडूंना संधी देण्यात आली, पण आता अचानक ही नावं निवडीमधून गायब झाली आहेत. रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार आणि राहुल द्रविड कोच झाल्यानंतर टीममध्ये बदल केले जातील आणि भविष्याचा विचार करून टीम बनवली जाईल, असं वाटत होतं, पण दोघांनीही जुन्याच खेळाडूंवरच विश्वास दर्शवला आहे. एक-दोन मॅचमध्येच संधी स्पिनर राहुल चहर, नितीश राणा, चेतन सकारिया, कृष्णप्पा गौतम, संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिक्कल आणि व्यंकटेश अय्यर या खेळाडूंना 2021 साली एक-दोन संधी देण्यात आल्या, पण यातल्या बहुतेकांना टीमबाहेर करण्यात आलं. ऋतुराजला फक्त वनडेमध्ये संधी देण्यात आली आहे, तर व्यंकटेश अय्यरला फक्त टी-20 टीममध्ये निवडण्यात आलं आहे. व्यंकटेश अय्यर नुकत्याच दक्षिण आफ्रिकेत झालेल्या वनडे सीरिजमध्ये खेळला होता, पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजमधून त्याला अचानक बाहेर करण्यात आलं. बी टीमनंतर प्रमोशन नाही नितीश राणा, चेतन सकारिया, राहुल चहर आणि संजू सॅमसन या खेळाडूंना मागच्या वर्षी श्रीलंका दौऱ्यात संधी मिळाली होती. भारताचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे भविष्याचा विचार करत हे युवा खेळाडू श्रीलंकेत खेळले होते. यानंतर दक्षिण आफ्रिकेत किंवा वेस्ट इंडिजविरुद्ध या खेळाडूंना संधी देण्यात आली नाही. आता वनडेमध्ये रवी बिष्णोई, दीपक हुड्डा, आवेश खान यांना निवडण्यात आलं आहे. देवदत्त आणि ऋतुराज गायब आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी केल्यानंतर देवदत्त पडिक्कलने मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. देवदत्तला श्रीलंकेविरुद्ध टी-20 खेळण्याची संधी मिळाली, पण आता तो अचानक गायब झाला. असंच काहीसं महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडसोबतही झालं आहे. ऋतुराजला दक्षिण आफ्रिकेत एकही मॅचमध्ये खेळवण्यात आलं नाही. आता भारतात आल्यानंतर ऋतुराजला टी-20 टीममधूनच बाहेर करण्यात आलं आहे. भारताकडून 2021 साली वनडेमध्ये 10 खेळाडूंनी तर टी-20 मध्ये 11 खेळाडूंनी पदार्पण केलं, पण यातल्या बहुतेक खेळाडूंवर निवड समिती कर्णधार आणि कोचनी विश्वास दाखवला नाही.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Team india

    पुढील बातम्या