ICC चा नवा नियम वादात, बुमराहच्या चेंडूवर ब्राव्हो रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर उठवला प्रश्न!

ICC चा नवा नियम वादात, बुमराहच्या चेंडूवर ब्राव्हो रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर उठवला प्रश्न!

भारताविरुद्धच्या सामन्यात विंडीजचा खेळाडू ड्वेन ब्राव्होला बुमराहचा बाऊन्सर लागल्यानं रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं. त्याच्याजागी ब्लॅकवूडनं चौथ्या दिवशी फलंदाजी केली.

  • Share this:

जमैका, 03 सप्टेंबर : भारतानं विंडीजला व्हाइट वॉश देऊन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये धमाकेदार सुरुवात केली आहे. भारत आणि विंडीज यांच्यात जमैकामध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी ड्वेन ब्राव्होला रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं. तिसऱ्या दिवशी बुमराहच्या उसळत्या चेंडूचा तडाखा त्याच्या डोक्याला बसला होता. त्यावेळी ब्राव्होचं हॅल्मेट तुटलं होतं. त्यामुळं चौथ्या दिवशी खेळपट्टीवरच त्याला चक्कर आली.

ड्वेन ब्राव्होच्या जागी जेरेमी ब्लॅकवूडला बदली खेळाडू म्हणून संघात घेण्यात आलं. चौथ्या दिवशी जेरेमी ब्लॅकवूड फलंदाजीला मैदानात उतरला. मार्नस लॅब्यूशेननंतर बदली खेळाडू म्हणून फलंदाजीला आलेला ब्लॅकवूड दुसऱा खेळाडू ठरला. मार्नस लॅब्यूशेन अॅशेस मालिकेत स्टीव्ह स्मिथच्या जागी बदली खेळाडू म्हणून संघात आला होता. जोफ्रा आर्चरच्या बाऊन्सरमुळं स्टीव्ह स्मिथ जखमी होऊन रिटायर्ड हर्ट झाला होता.

बदली खेळाडूवरून आता वाद निर्माण झाला आहे. काहींनी या नियमाचं स्वागत केलं आहे तर काहींनी गोलंदाजांसाठी धोक्याचं आहे असं म्हटलं आहे.गोलंदाजांना दुखापत होण्याची शक्यता जास्त असते.

फलंदाजांच्या डोक्याला दुखापत होण्याचं प्रमाण वाढलं आहे. तीन आठवड्याच्या आत मार्नस लॅब्यूशेन आणि ब्लॅकवूड हे दोन खेळाडू बदली म्हणून संघात खेळले. विंडीजचे माजी वेगवान गोलंदाज अँडी रॉबर्ट्स यांनी इंडियन एक्सप्रेसनं हा नियम चुकीचा असल्याचं म्हटलं आहे.

अँडी रॉबर्ट्स यांच्या म्हणण्यानुसार ब्राव्हो त्याच्या चुकीमुळं दुखापतग्रस्त झाला. त्यानं चेंडू पाहिलासुद्धा नाही. त्याला चेंडू डक करता आला नाही आणि शॉर्ट बॉलवर लाइनवरून बाजूला होता आलं नाही. ब्राव्होनं डोळे बंद केले होते. त्याला वैद्यकीय मदत देण्यात आली. बाकी दिवसभर तो नॉर्मल दिसत होता.

रॉबर्ट्स म्हणाले की, त्यांच्या काळात फलंदाजांचं जखमी होणं सामान्य होतं. पण ते खेळाडू कधी डोक्यावर चेंडू लागून जखमी झाले नव्हते. बाऊन्सरचा मारा झाला तरी चेंडू डोक्यावर लागायचा नाही. खेळाडू चेंडू बघायचे आणि मारायचे. काही खेळाडू तर बाऊन्सर हूक करण्यात आणि पुल करण्यातही तरबेज होते.

ब्राव्होच्या तुलनेत स्मिथला जोरात तडाखा बसला होता. या दोन्ही खेळाडूंच्या जागी आलेल्या बदली खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. लॅब्यूशेननं तीन डावात 59, 74 आणि 80 धावांची खेळी केली. तर ब्राव्होच्या जागी खेळणाऱ्या ब्लॅकवूडनं अखेरची कसोटी 2017 मध्ये खेळली होती. त्यानंही भारतीय गोलंदाजांना दमवलं.

VIDEO: उरणच्या ओएनजीसी प्लांटमध्ये भीषण अग्नितांडव! नागरिकांमध्ये भीती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Sep 3, 2019 11:32 AM IST

ताज्या बातम्या