IND vs WI-A, Practice Match : तब्बल 8 महिन्यांनंतर तळपली रहाणेची बॅट! पण धिमी फलंदाजी अडचणीची

IND vs WI-A, Practice Match : तब्बल 8 महिन्यांनंतर तळपली रहाणेची बॅट! पण धिमी फलंदाजी अडचणीची

सराव सामन्यात भारताकडे आता तब्बल 305 धावांची आघाडी आहे.

  • Share this:

अँटिगा, 20 ऑगस्ट : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होत सराव कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. अजिंक्य रहाणे (54) आणि हनुमा विहारी (64) यांच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर भारतानं तिसऱ्या दिवशी 5 बाद 188 धावांवर डाव घोषित केला. त्यामुळं भारताकडे आता तब्बल 305 धावांची आघाडी आहे. या सामन्यात बऱ्याच काळापासून लयीत नसलेल्या अजिंक्य रहाणेनं कमबॅक केला. रहाणेनं 162 चेंडूत 54 धावा केल्या. सराव सामन्यात पहिल्या डावांत केवळ 1 धावा करत रहाणे बाद झाला होता. कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल 2 वर्ष रहाणेनं शतक केलेसे नाही. मात्र, 8 महिन्यांनंतर अजिंक्य रहाणेनं अर्धशतकी खेळी केली.

मात्र, वेस्ट इंडिज ए विरोधात झालेल्या दुसऱ्या डावांत त्यांना बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागला. गोलंदाजीचा सामना करण्यासाठी त्याला अडचणींचा सामना करावा लागला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रहाणेनं फक्त 20 धावा केल्या होत्या, त्यानंतर तीन चौकारांच्या मदतीनं 12 धावा केल्या. रहाणेनं 80 चेंडूत एकही धाव केली नाही. 35 ओव्हरपर्यंत तो मैदानात होत, मात्र त्याच्या धिम्या फलंदाजीमुळं भारताचा खेळ धिमा झाला. सोमवारी तिसऱ्या दिवशीच्या खेळात रहाणेनं 2 चौकार आणि 1 षटकार लगावला.

वाचा-शोएब मलीकनंतर पाकिस्तानचा ‘हा’ क्रिकेटपटू आज होणार भारताचा जावई!

काऊंटी क्रिकेटमध्ये नाही चालली रहाणेची बॅट

वेस्ट इंडिज दौऱ्याआधी इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत होता. मात्र, रहाणेला चांगली कामगिरी करता आली नाही. काऊंटी क्रिकेटमध्ये त्याला केवळ एक शतक आणि एक अर्धशतक करता आले. याशिवाय सात डावांमध्ये त्याला दहा धावाही करता आल्या नाहीत. 7 सामन्यात त्यानं 307 धावा केल्या.

वाचा-416 विकेटसह विश्वविक्रम नावावर पण तरीही भारतीय संघात नाही स्थान!

हनुमा विहारीने केले अर्धशतक

भारतानं तिसऱ्या दिवशी एक विकेट गमावत 84 धावा केल्या. विहारीनं 48 तर रहाणेनं 20 धावा करत, त्यानंतर अर्धशतक पूर्ण केल्या. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 125 धावांची भागिदारी केली. ही भागिदारी अक्रिम फ्रेजरनं तोडली. विहारीनं 125 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकार लगावला.

वाचा-‘आम्ही अणुबॉम्ब वापरू, भारताला एका फटक्यात साफ करू’; माजी पाक खेळाडू बरळला

VIDEO: इस्रोने रचला नवा इतिहास; 7 सप्टेंबरला 'चंद्रयान-2' चंद्रावर उतरणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 10:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading