INDvsWI : टीम इंडियाने टी20 मालिका 3-0 ने जिंकली, पंत-कोहलीची अर्धशतकं

ऋषभ पंत आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतानं तिसऱ्या टी20 सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवला.

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2019 08:08 AM IST

INDvsWI : टीम इंडियाने टी20 मालिका 3-0 ने जिंकली, पंत-कोहलीची अर्धशतकं

गयाना, 07 ऑगस्ट : भारताने विंडीजविरुद्ध तीन टी20 सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. शेवटच्या टी20 सामन्यात विंडीजने दिलेले 146 धावांचे आव्हान भारताने 19.1 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. ऋषभ पंत आणि विराट कोहली यांनी अर्धशतके केली. भारताचा गोलंदाजी दीपक चाहरनं तीन षटकांत फक्त 4 धावा देत विंडीजचे तीन गडी बाद केले. त्यानं केलेल्या टिच्चून माऱ्यामुळे विंडीजला 146 धावांत रोखता आलं. चाहरनं सामनावीर पुरस्कार पटकावला.

विंडीजने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवन आणि केएल राहुल लवकर बाद झाले. धवन 20 धावांवर तर राहुल 3 धावांवर बाद झाला. त्यानंतर पंत आणि कोहलीनं ड़ावाची सूत्रे हाती घेतली. दोघांनी शतकी भागिदारी करून संघाला विजयाच्या समीप नेलं. 18 व्या षटकात विराट कोहली 59 धावांवर बाद झाला. त्यानंतर पंत आणि मनीष पांडे यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. रिषभ पंतने 20 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार मारून विजय मिळवून दिला. ऋषभ पंतने 42 चेंडूत 65 धावांची खेळी केली.

तत्पूर्वी, गयाना इथं झालेल्या तिसऱ्या सामन्यावरही पावसाचे सावट होते. पावसामुळं सामना उशिरानं सुरु झाला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विंडीजच्या आघाडीच्या फळीला दीपक चाहरने दणका दिला. त्याने पहिले तीन फलंदाज तंबूत धाडले. यामुळं विंडीजची अवस्था 3 बाद 14 अशी झाली होती. त्यानंतर पोलार्ड, पूरन यांनी संघाचा डाव सावरला. निकोलस पूरन बाद झाल्यानंतर रॉमन पॉवेलनं फटकेबाजी केली. पोलार्डने 58 तर पॉवेलनं 32 धावा केल्या. भारताकडून दीपक चाहरने तीन, नवदीप सैनीनं दोन तर राहुल चाहरनं एक गडी बाद केला.

VIDEO: भाजपमधलं उमदं नेतृत्व हरपलं- माधव भांडारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 7, 2019 08:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...