IND vs WI 3rd ODI : तिसऱ्या वनडेसह भारताचा मालिका विजय, विंडीजला 6 गडी राखून नमवलं

IND vs WI 3rd ODI : तिसऱ्या वनडेसह भारताचा मालिका विजय, विंडीजला 6 गडी राखून नमवलं

भारताचा कर्णधार विराट कोहलीचे शतक आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर पुन्हा एकदा विंडीजवर विजय मिळवला.

  • Share this:

त्रिनिदाद, 15 ऑगस्ट : वेस्ट इंडीजविरुद्ध टी20 पाठोपाठ वनडे मालिकाही भारताने जिंकली. त्रिनिदादमध्ये झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 6 गडी राखून विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळं सामना 35 षटकांचा खेळवण्यात आला. विंडीजनं 7 बाद 240 धावा केल्या. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 35 षटकांत 255 धावांचे आव्हान मिळालं. भारताने हे आव्हान 32.3 षटकांतच 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अखेरचा सामना खेळणाऱ्या ख्रिस गेलनं वादळी खेळी केली. त्यानं 41 चेंडूत 72 धावांची खेळी केली. त्यानंतर एविन लुईसनं 29 चेंडूत 43 धावां फटकावल्या. दोघांनी 115 धावांची भागिदारी केली. यातील 100 धावा तर 33 चेंडूतच केल्या होत्या. मात्र, एविन लुईस बाद झाल्यानंतर विंडीजचा डाव गडगडला. शेवटी निकोलस पूरननं 16 चेंडूत 30 धावांची खेळी केली. या जोरावर विंडीजनं 240 धावांपर्यंत मजल मारली.

डकवर्थ लुईसनुसार भारताला 255 धावांचं आव्हान मिळालं. भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट आणि धवनने दुसऱ्या विकेटसाठी 66 धावांची भागिदारी केली. विंडीजच्या फाबियान एलेननं 13 व्या षटकात धवन आणि पंतला लागोपाठ बाद केलं. धवन 36 धावांवर बाद झाला. दुसऱ्या सामन्याप्रमाणे यावेळी पुन्हा श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांनी शतकी भागिदारी केली. श्रेयस अय्यरनं 33 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. अय्यर 65 धावांवर बाद झाला. त्याने कोहलीसोबत 120 धावांची भागिदारी केली. विराटनं त्याच्या कारकिर्दीतील 43 वं एकदिवसीय शतक केलं. तसेच एका दशकात 20 धावा करणारा विराट कोहली जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. अय्यर बाद झाल्यानंतर विराटनं केदार जाधवसोबत 44 धावांची अभेद भागिदारी करत भारताला सामन्यासह मालिका जिंकून दिली. विराटने सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार पटकावला.

SPECIAL REPORT : पुरातले 'हे' असे देवदूत, ज्यांनी वाचवला अनेकांचा जीव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 15, 2019 08:05 AM IST

ताज्या बातम्या