Home /News /sport /

IND vs WI : 36 वर्षांचा खेळाडू रोहितसोबत करणार ओपनिंग, अशी असणार भारताची Playing XI!

IND vs WI : 36 वर्षांचा खेळाडू रोहितसोबत करणार ओपनिंग, अशी असणार भारताची Playing XI!

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या वनडे सीरिजला (India vs West Indies) 6 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. तीन वनडे मॅचच्या या सीरिजनंतर 3 टी-20 मॅचही खेळवल्या जातील. या सीरिजमधून रोहित शर्माचं (Rohit Sharma) टीम इंडियात पुनरागमन झालं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 29 जानेवारी : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या वनडे सीरिजला (India vs West Indies) 6 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. तीन वनडे मॅचच्या या सीरिजनंतर 3 टी-20 मॅचही खेळवल्या जातील. या सीरिजमधून रोहित शर्माचं (Rohit Sharma) टीम इंडियात पुनरागमन झालं आहे, तसंच दोन्ही फॉरमॅटमध्ये तो टीम इंडियाचं नेतृत्व करेल. दुखापतीमुळे रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला नव्हता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजसाठी शिखर धवनची (Shikhar Dhawan) टीममध्ये निवड झाली आहे, तसंच केएल राहुलला (KL Rahul) उपकर्णधार करण्यात आलं आहे, त्यामुळे ओपनिंगला कोण खेळणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या वनडे सीरिजमध्ये रोहितच्या गैरहजेरीत राहुल आणि धवनने ओपनिंगला बॅटिंग केली होती. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजसाठी कर्णधार रोहित शर्मासोबत 36 वर्षांचा शिखर धवन ओपनिंगला बॅटिंग करेल, हे जवळपास निश्चित मानलं जातंय. रोहित आणि धवन या जोडीचं ओपनिंगचं रेकॉर्डही उत्कृष्ट आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या वनडे सीरिजमध्येही धवनने चांगली कामगिरी केली होती. अशी असणार मिडल ऑर्डर रोहित-धवनची जोडी ओपनिंगला खेळल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली खेळेल. यानंतर मिडल ऑर्डरमध्ये ऋषभ पंत, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर असतील. दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर फिनिशरच्या भूमिकेत दिसू शकतात. या दोन्ही खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेत वनडे सीरिजमध्ये बॅटने शानदार कामगिरी केली होती. स्पिन बॉलिंगमध्ये कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांची कुलचा जोडी बरेच दिवसांनी मैदानात दिसू शकते. तर प्रसिद्ध कृष्णा तिसरा फास्ट बॉलर असण्याची शक्यता आहे. भारताची संभाव्य प्लेयिंग इलेव्हन रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेट कीपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल भारताची वनडे टीम रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान वनडे सीरिजचं वेळापत्रक पहिली वनडे- 6 फेब्रुवारी, अहमदाबाद दुसरी वनडे- 9 फेब्रुवारी, अहमदाबाद तिसरी वनडे- 12 फेब्रुवारी, अहमदाबाद
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Rohit sharma, Shikhar dhawan, Team india, West indies

    पुढील बातम्या