विकेट मिळाल्यावर भडकले बुमराह आणि कोहली, प्रेक्षकांना दिला इशारा!

विकेट मिळाल्यावर भडकले बुमराह आणि कोहली, प्रेक्षकांना दिला इशारा!

विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं 13 गडी बाद केले. दुसऱ्या कसोटीत एकाच डावत त्यानं 6 गडी बाद केले होते.

  • Share this:

जमैका, 03 सप्टेंबर : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं विंडीजच्या फलंदाजांची झोप उडवली. त्यानं कसोटी मालिकेत 13 विकेट घेतल्या. विकेट घेतल्यानंतर शांतपणे जल्लोष कऱणारा बुमराह दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी मात्र भडकलेला बघायला मिळाला. बुमराहनं विंडीजचा फलंदाज जेरेमी ब्लॅकवूडची विकेट घेतल्यानंतर प्रेक्षकांना गप्प बसण्याचा इशारा केला. तर कर्णधार विराट कोहलीसुद्धा रागात दिसला. त्यानंसुद्धा तोंडावर बोट ठेवून प्रेक्षकांना इशारा करत जल्लोष केला.

विराट कोहली आणि बुमराह भडकण्याचं कारण मिड ऑफला बसलेले प्रेक्षक होते. ते प्रेक्षक भारतीय खेळाडूंवर वारंवार शेरेबाजी करत होते. यानंतर बुमराहनं ब्लकवूडची विकेट घेताच मागे वळून प्रेक्षकांना इशारा केला. बुमराहनंतर विराटनसुद्धा त्याचपद्धतीनं इशारा दिला.

बुमराहन घेतलेल्या विकेटनंतर विराट कोहलीनं त्याच्या क्षेत्ररक्षणातून प्रेक्षकांना उत्तर दिलं. विराटनं ब्रूक्सला धावबाद केलं. त्यावेळी विराटनं पुन्हा एकदा प्रेक्षकांकडे पाहून आक्रमक इशारा केला.

जमैकातील कसोटीमध्ये बुमराहनं जबरदस्त कामगिरी केली. त्यानं पहिल्या डावात 6 गडी बाद केले. यात एका हॅट्ट्रिकचाही समावेश आहे. कसोटीत हॅट्ट्रिक घेणारा बुमराह भारताचा तिसरा गोलंदाज आहे. बुमराहनं 12 कसोटीत 5 वेळा एका डावात 5 गडी बाद करण्याची कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि विंडीजविरुद्ध एकाच डावात 5 विकेट घेणारा बुमराह पहिला आशियाई गोलंदाज आहे.

VIDEO: Ganesh Chaturthi 2019: दगडूशेठ गणपतीसमोर ऋषीपंचमीच्या निमित्तानं सामूहिक अथर्वशीर्ष पठण

Published by: Suraj Yadav
First published: September 3, 2019, 10:16 AM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading