भारताचा विंडीजवर क्लीन स्विप, दुसऱ्या कसोटीत 257 धावांनी विजय

विंडीजविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका भारतानं 2-0 ने जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत विजयी सुरुवात केली.

News18 Lokmat | Updated On: Sep 3, 2019 08:21 AM IST

भारताचा विंडीजवर क्लीन स्विप, दुसऱ्या कसोटीत 257 धावांनी विजय

जमैका, 03 सप्टेंबर : भारतानं विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात 257 धावांनी विजय मिळवला. यासह 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने विजय मिळवला. भारतानं दिलेल्या 468 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा संघ 210 धावांपर्यंत मजल मारू शकला. विंजीजकडून शामरा ब्रूक्सनं दुसऱ्या डावात सर्वाधिक 50 धावा केल्या. कर्णधार जेसन होल्डरनं 39 आणि ब्लॅकवूडनं 38 धावा केल्या. भारताच्या मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन तर इशांत शर्मानं 2 गडी बाद केले. पहिल्या डावात 6 गडी बाद करणाऱ्या बुमराहनं दुसऱ्या डावात एक गडी बाद केला.

विंडीजनं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीला पाचारण केलं. भारतानं पहिल्या डावात 416 धावा केल्या होत्या. यामध्ये हनुमा विहारीचं शतक आणि कर्णधार विराट कोहली, इशांत शर्मा आणि मयंक अग्रवाल यांनी अर्धशतकं केली. विंडीजकडून जेसन होल्डरनं 5, राहकीम कार्नवॉलनं 3 तर केमार रोच आणि क्रेग ब्रेथवेट यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारताकडून जसप्रीत बुमराहनं 6, मोहम्मद शमीने 2 तर इशांत शर्मा आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

भारतानं पहिल्या डावात 299 धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 4 बाद 168 धावांवर डाव घोषित केला. विंडीजला विजयासाठी 468 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजचा संघ 218 धावा करू शकला. भारतानं हा सामना 257 धावांनी जिंकून मालिका 2-0 ने जिंकली. भारतानं पहिला सामना 318 धावांनी जिंकला होता.

हनुमा विहारीला मॅन ऑफ द मॅच तर अजिंक्य रहाणेला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. रहाणेनं दोन सामन्यात 81, 102, 24 आणि नाबाद 64 धावांची खेळी केली. तर हनुमा विहारीनं पहिल्या डावात 111 आणि दुसऱ्या डावात नाबाद 53 धावा केल्या. त्यानं पहिल्या कसोटीत 32 आणि 93 धावांची खेळी केली होती. बुमराहनं कसोटी मालिकेत 13 आणि इशांत शर्मानं 12 तर मोहम्मद शमीने 9 विकेट घेतल्या.

SPECIAL REPORT: अब्दुल सत्तारांमुळे शिवसेनेचं बळ वाढणार?

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Sep 3, 2019 08:21 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...