IND vs WI, 2nd Test Day 3 : दुसऱ्या डावात रहाणे-विहारीने सावरलं, भारताला विजयासाठी 8 विकेटची गरज

आघाडीची फळी पुन्हा अपयशी ठरल्यानंतर रहाणे आणि विहारीनं भारताचा डाव सावरला.

News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2019 08:14 AM IST

IND vs WI, 2nd Test Day 3 : दुसऱ्या डावात रहाणे-विहारीने सावरलं, भारताला विजयासाठी 8 विकेटची गरज

जमैका, 02 सप्टेंबर : वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताने दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 4 बाद 168 धावा केल्या. त्यापूर्वी विंडीजचा पहिला डाव 117 धावांत आटोपला. भारतानं पहिला डाव घोषित करून विंडीजला 468 धावांचे आव्हान दिलं आहे. तिसऱ्या दिवशी या आव्हानाचा पाठलाग करताना दिवसअखेर विंडीजच्या दोन बाद 45 धावा झाल्या. ब्राव्हो 18 धावांवर तर ब्रूक्स 4 धावांवर खेळत आहे.

विंडीजच्या दुसऱ्या डावात इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. पहिल्या डावात विराट कोहलीनं फॉलोऑन न देता दुसऱा डाव खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारताची सुरुवात चांगली झाली नाही. पहिले चार गडी 57 धावांवर तंबूत परतले. त्यानंतर रहाणे आणि विहारीनं डाव सावरला.

भारताची आघाडीची फळी पुन्हा एकदा अपयशी ठरली. केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. चेतेश्वर पुजारा 27 धावांवर बाद झाला. तर कर्णधार विराट कोहलीला खातंही उघडता आलं नाही. त्यानंतर रहाणेनं नाबाद 64 आणि हनुमा विहारीनं नाबाद 53 धावांची खेळी केली. 4 बाद 167 धावांवर भारतानं डाव घोषित केला. विंडिजच्या केमार रोचनं 28 धावांत तीन गडी बाद केले.

VIDEO: प्रथम तुला वंदितो...मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Sep 2, 2019 08:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...