INDvsWI : पंत-विहारी यांनी सावरला डाव, भारताच्या पहिल्या दिवसअखेर 5 बाद 264 धावा

INDvsWI : पंत-विहारी यांनी सावरला डाव, भारताच्या पहिल्या दिवसअखेर 5 बाद 264 धावा

विंडीजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवसअखेर 5 बाद 264 धावा केल्या. मयंक अग्रवाल आणि विराट कोहलीनं अर्धशतके केली.

  • Share this:

जमैका, 31 ऑगस्ट : विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने 5 बाद 264 धावांपर्यंत मजल मारली. जमैकातील सबीना पार्क ग्राउंडवर हा सामना सुरु आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाच्या 32 धावा झाल्या असताना भारताला पहिला धक्का बसला. केएल राहुल 13 धावांवर बाद झाला. जेसन होल्डरच्या चेंडूवर तो बाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेलेल्या चेतेश्वर पुजाराला पदार्पण करणाऱ्या कार्नवॉलनं 6 धावांवर बाद केलं.

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि मयंक अग्रवाल यांनी 69 धावांची भागिदारी करून डाव सावरला. भारताच्या 115 धावा झाल्या असताना मयंक अग्रवाल 55 धावांवर बाद झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणे 24 धावा करून बाद झाला. त्यावेळी संघाच्या चार बाद 164 धावा झाल्या होत्या.

रहाणे बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि हनुमा विहारी यांनी 76 धावांची भागिदारी करून संघाची धावसंख्या 200 च्या पार पोहचवली. त्यानंतर पंत आणि विहारी यांनी डाव सावरला. दोघांनी सहाव्या गड्यासाठी 62 धावांची अभेद भागिदारी केली. विंडीजकडून जेसन होल्डरनं 3, केमार रोच आणि कार्नवॉलने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.

भारतीय संघ : लोकेश राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

विंडीजचा संघ : क्रेग ब्रैथवेट, जॉन कॅपबेल, शामरा ब्रुक्स, ड्वेन ब्रावो, शिम्रॉन हेटमायर, जेमार हॅमिल्टन (यष्टीरक्षक), रहकीम कॉर्नवाल , रोस्टन चेज, जेसन होल्डर (कर्णधार), केमार रोच, शेनन गॅब्रिएल

मुंबईतील 'नो पार्किंग' झोनची मनसेकडून पोलखोल, पाहा SPECIAL REPORT

First published: August 31, 2019, 7:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading