IND vs WI 2nd Test Day 2 : बुमराहच्या गोलंदाजीनं विंडीजची दाणादाण, दुसऱ्या कसोटी भारताची मजबूत पकड

दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हनुमा विहारीचं शतक आणि इशांत शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं 416 धावांपर्यंत मजल मारली.

News18 Lokmat | Updated On: Sep 1, 2019 08:35 AM IST

IND vs WI 2nd Test Day 2 : बुमराहच्या गोलंदाजीनं विंडीजची दाणादाण, दुसऱ्या कसोटी भारताची मजबूत पकड

जमैका, 01 सप्टेंबर : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं मजबूत पकड मिळवली आहे. हनुमा विहारीच्या शतकानंतर बुमराहच्या गोलंदाजीच्या जोरावर भारत मजबूत स्थितीत पोहचला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विंडीजच्या पहिल्या डावात 7 बाद 87 धावा झाल्या होत्या. कार्नवॉल 4 तर हॅमिल्टन 2 धावांवर खेळत होते.

भारतानं पहिल्या डावात 416 धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या विंडीजच्या फलंदाजीला बुमराहनं खिंडार पाडलं. त्यानं 9.1 षटकांत फक्त 16 धावा देत 6 फलंदाजांना तंबूत धाडले. त्याच्यासमोर एकही फलंदाज टिकू शकला नाही. बुमराहशिवाय मोहम्मद शमीने एक गडी बाद केला. त्याने 8 षटकांत 19 धावा दिल्या. विंडीजचा सलामीवीर ब्रेथवेट 10 धावा, हेटमायर, 34 धावा तर कर्णधार जेसन होल्डर 18 धावा करू शकले. यांच्याशिवाय इतर एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही.

तत्पूर्वी, भारतानं पहिल्या डावात हनुमा विहारीचं शतक, विराट कोहली आणि इशांत शर्मा, मयंक अग्रवाल यांच्या शतकाच्या जोरावर 416 धावा केल्या.

Loading...

हनुमा विहारीने 111 धावा केल्या. विराट कोहली 76 धावा, इशांत शर्मा 57 तर मयंक अग्रवालनं 55 धावा केल्या. जेसन होल्डरनं सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. रहकीम कार्नवॉलनं 3 तर केमार रोच आणि कार्लोस ब्रेथवेटनं प्रत्येकी एक गडी बाद केला.

VIDEO :...जर सेनासोबत नसेल तर भाजपला इतक्या जागा, आठवलेंचं भाकीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2019 08:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...