India vs West Indies 2nd T20 Live Score- भारताची रो'हिट' दिवाळी, टी-२० मालिकाही जिंकली

India vs West Indies 2nd T20 Live Score- भारताची रो'हिट' दिवाळी, टी-२० मालिकाही जिंकली

टीम इंडियाने चाहत्यांना खऱ्या अर्थाने दिवाळीची भेट दिली असेच म्हणावे लागेल

  • Share this:

लखनऊ, ६ नोव्हेंबर २०१८- भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नाबाद शतकी खेळीमुळे भारताने विंडीजविरुद्धचा दुसरा टी२० सामना २-० असा एकहाती जिंकत मालिकाही आपल्या नावावर केली. भारताने हा सामना तब्बल ७१ धावांनी जिंकला. त्यामुळे टीम इंडियाने चाहत्यांना खऱ्या अर्थाने दिवाळीची भेट दिली असेच म्हणावे लागेल.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी२० या तीनही मालिकांवर भारताने एकहाती विजय मिळवला. भारताने विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात १९५ धावांचा डोंगर उभा केला. विंडीजने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सलामीची जोडी रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी अचूक फलंदाजी करत १२३ धावांची भागिदारी केली. शिखर धवन ४३ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतही (५) मैदानात फार काळ टिकू शकला नाही. पण दुसरीकडे भारताच्या कर्णधाराची चौफेर फटकेबाजी सुरूच होती. त्याला मोलाची साथ मिळाली ती केएल राहुलची. राहुलने १४ चेंडूत २६ धावा ठोकल्या.

एकीकडे रोहितने त्याच्या फलंदाजीने धावांचा डोंगर उभा केला. तर दुसरीकडे भारतीय गोलंदाजांनीही चोख कामगिरी बजावली. भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. कृणाल पांड्याला मात्र एकही गडी बाद करता आला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2018 07:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading