IND vs WI 1st Test : बुमराहनं रचला इतिहास, कसोटीत 'ही' कामगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाज

IND vs WI 1st Test : बुमराहनं रचला इतिहास, कसोटीत 'ही' कामगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाज

विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बुमराहनं 5 गडी बाद करून भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली.

  • Share this:

अँटिगुआ, 26 ऑगस्ट : भारताने विंडीजला पहिल्या सामन्यात 318 धावांनी पराभूत करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या स्पर्धेला विजयी सुरुवात केली आहे. कसोटीच्या चौथ्याच दिवशी भारतानं विंडीजला 100 धावांत गुंडाळलं. यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं 5 गडी बाद करून इतिहास रचला आहे. त्यानं फक्त 7 धावात 5 गडी बाद केले. यासह त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि विंडीज या देशांविरुद्ध एकाच डावात 5 गडी बाद करण्याची कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे. बुमराहनं 11 कसोटी सामने खेळले असून त्यानं या चारही देशांविरुद्धच्या पहिल्याच दौऱ्यात ही कामगिरी केली आहे.

दुसऱ्या डावात कार्लोस ब्रेथवेट, जॉन कॅपबेल, ड्वेन ब्राव्हो, शाय होप आणि जेसन होल्डर यांना बुमराहनं बाद केलं. यामध्ये बुमराहनं ब्रेथवेट वगळता इतर चार फलंदाजांना त्रिफळाचित केलं. यासह बुमराह कसोटीच्या कोणत्याही एका डावात चार फलंदाजांचा त्रिफळा उडवणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला. ब्रेथवेट ऋषभ पंतकडे झेल देऊन बाद झाला.

इंग्लंडमध्ये झालेल्या वर्लढ कप स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध बुमराहनं चार फलंदाजांचा त्रिफळा उद्ध्वस्त केला होता. तेव्हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा बुमराह पहिलाच भारतीय वेगवान गोलंदाज ठरला होता.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं 318 धावांनी दणदणीत विजय मिळवला. यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेला विजयी सुरुवात केली. भारतानं पहिल्या डावत 297 धावा केल्या होत्या. त्यानंतर विंडीजने 222 धावांपर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या डावात भारतानं 343 धावांवर डाव घोषित केला. विंडीजसमोर 418 धावांचं आव्हानं दिलं होतं. त्यानंतर विंडीजचा डाव 100 धावांवर संपुष्टात आला.

SPECIAL REPORT: भाभीजीला पाकिस्तानला जाण्याची चटक, दिलं हे चॅलेंज!

Published by: Suraj Yadav
First published: August 26, 2019, 8:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading