विंडीजला आव्हान देऊन विराट फसला, बाऊन्सरने केला घात

विंडीजला आव्हान देऊन विराट फसला, बाऊन्सरने केला घात

पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली फक्त 9 धावांवर बाद झाला.

  • Share this:

अँटिगुआ, 23 ऑगस्ट : वेस्ट इंडीज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाची पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी घसरगुंडी उडाली. अजिंक्य रहाणेनं डाव सावरल्यानं भारताला दिवसअखेर 6 बाद 203 धावांपर्यंत मजल मारता आली. दरम्यान, लोकेश राहुल वगळता भारताचे आघाडीचे फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाहीत. सलामीवीर मयंक अग्रवाल फक्त 5 धावांवर झेलबाद झाला. तर भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा फक्त 2 धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहलीला ग्रॅबियलने बाद केलं. विराट 12 चेंडूत 9 धावा काढून बाद झाला.

कसोटी सामन्याच्या आधी विराटने मला बाऊन्सर टाका असं म्हटलं होतं. त्याच बाऊन्सरने त्याचा घात केला. त्याच्यावर बाऊन्सरचा मारा होत असताना त्याला समर्थपणे तोंड देता येत नसल्याचं दिसत होतं. कोहलीला पहिल्या डावात 12 चेंडूत 9 धावा करता आल्या. यामध्ये 2 चौकार लगावल्यानं तो धावा करेल असं वाटत होतं. मात्र, गॅब्रियलच्या एका बाऊन्सरवर तो झेलबाद झाला.

सध्या अॅशेस मालिकेत जोफ्रा आर्चरच्या बाऊन्सरने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना जखमी केलं आहे. स्टीव्ह स्मिथला जोफ्राचा चेंडू मानेवर लागल्यानं दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात खेळता आलं नव्हतं. त्याशिवाय तो तिसऱ्या कसोटीलाही मुकला आहे. त्यानंतर विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी विराटने फलंदाजीला उतरल्यावर सुरुवातीलाच मला बाऊन्सर टाकावा असं म्हटलं होतं. सुरुवातीलाच बाऊन्सर मिळाला तर खेळण्यासाठी उर्जा मिळेल. आणखी इर्षेनं खेळता येईल त्यामुळं बाऊन्सर टाकावा असं कोहली म्हणाला होता.

पहिल्या कसोटीत नाणेफेक जिंकून विंडीजने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार जेसन होल्डरचा हा निर्णय सार्थ ठरवत विंडीजच्या गोलंदाजांनी भारताची 3 बाद 25 अशी अवस्था केली. मयंक अग्रवाल 5 धावा, चेतेश्वर पुजारा 2 धावा आणि विराट कोहली 9 धावांवर बाद झाले. आघाडीची फळी लवकर बाद झाल्यानंतर लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणेनं डाव सावरला. मात्र, राहुल 44 धावांवर बाद झाला. त्यानंतर रहाणेनं हनुमा विराहीला साथीला घेत पडझड थांबवली. हनुमा विहारी 32 धावांवर बाद झाला. त्यानंतर लगेच अजिंक्य रहाणेसुद्धा बाद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऋषभ पंत 20 धावांवर तर रविंद्र जडेजा 3 धावांवर खेळत होते.

VIDEO: धक्कादायक! ट्रेनमध्ये मागवलेल्या ऑम्लेटमध्ये आढळल्या अळ्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 23, 2019 07:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading