IND vs WI, 1st Test, Day 2: ईशांत शर्माचा पंच, भारताची कसोटीवर पकड

IND vs WI, 1st Test, Day 2: ईशांत शर्माचा पंच, भारताची कसोटीवर पकड

पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 297 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर विंडीजच्या दुसऱ्या दिवसअखेर 8 बाद 189 धावा झाल्या आहेत.

  • Share this:

अँटिगुआ, 24 ऑगस्ट : विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतानं पहिल्या डावात 297 धावा केल्या. त्यानंतर विंडीजला दुसऱ्या दिवसअखेर 8 बाद 189 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडे अद्याप 108 धावांची आघाडी आहे. भारताकडून ईशांत शर्माने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या तर मोहम्मद शमी, बुमराह आणि जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जेसन होल्डर 10 धावांवर खेळत होता. तर मिगुएल कमिन्स त्याच्यासोबत मैदानात होता.

दरम्यान, पहिल्या दिवसाच्या 6 बाद 203 धावांवरून पुढे खेळताना भारताला 297 धावांपर्यंत मजल मारता आली. ऋषभ पंतला फक्त 4 धावांची भर घालता आली. तो 24 धावांवर बाद झाला. त्यानंतर रविंद्र जडेजाने 58 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूने इशांत शर्माने त्याला साथ दिली. इशांत शर्मा 19 धावांवर बाद झाला. वेस्ट इंडीजकडून केमार रोचने चार तर शेनॉन गॅब्रियलनं तीन गडी बाद केले.

भारताचा पहिला डाव आटोपल्यानंतर गोलंदाजांनीसुद्धा जबरदस्त कामगिरी केली. विंडीजकडून रोस्टन चेजनं सर्वाधिक 48 धावा केल्या. त्याच्याशिवाय इतर फलंदाज इशांत शर्माच्या माऱ्यासमोर टिकू शकले नाहीत. विंडीजला मोहम्मद शमीने पहिला दणका दिला. त्यानं कॅपबेलला त्रिफळाचित केलं. त्यानंत ईशांत शर्मानं ब्रेथवेटला बाज केलं. त्यानंतर जडेजानं ब्रूक्सला बाद करून विंडीजला तिसरा धक्का दिला. त्यानंतर बुमराहनं ड्वेन ब्राव्होला पायचित केलं. तेव्हा विंडीजची अवस्था 4 बाद 88 अशी झाली होती. टोस्टन चेजनं शाय होपच्या साथीने डाव सावरला असताना इशांत शर्मानं ही जोडी फोडली. 130 धावांवर रोस्टन चेज बाद झाला. त्यानंतर इशांतने शाय होप, हेटमायर आणि केमार रोचला बाद केलं.

VIDEO: भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली; दुर्घटनेची भीषण दृश्यं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 24, 2019 07:38 AM IST

ताज्या बातम्या