'माझ्या या खेळीचा आदर्श घेऊ नका,चूक होती ती सुधारली' विराटचा युवा खेळाडूंना सल्ला

'माझ्या या खेळीचा आदर्श घेऊ नका,चूक होती ती सुधारली' विराटचा युवा खेळाडूंना सल्ला

विंडिजविरुद्धच्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने तुफान फटकेबाजी करत एकहाती भारताला सामना जिंकून दिला.

  • Share this:

हैदराबाद, 06 डिसेंबर : वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिल टी20 सामना भारताने 6 गडी राखून जिंकला. यात भारताचा कर्णधार विराट कोहलीनं 50 चेंडूत केलेल्या 94 धावांच्या तुफान फटकेबाजीची चर्चा जोरात झाली. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

विंडीजने 5 बाद 207 धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीने केलेल्या तुफान फटकेबाजीने विजय साजरा केला. विराटने वेगवान खेळी केली असली तरी सुरुवात मात्र अडखळत झाली. विराटने सामनावीर पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना याबाबात धक्कादायक खुलासा केला.

विराट म्हणाला की, सर्व युवा फलंदाजांनी माझ्या सुरुवातीच्या खेळीकडे बघून आदर्श घेऊ नये. मी त्यावेळी चेंडूला गरजेपेक्षा जास्त ताकद लावून मारण्याचा प्रयत्न करत होतो. होल्डरच्या षटकात काही फटके तसे मारल्यानंतर माझ्या नैसर्गिक खेळाला सुरुवात झाली. या मधल्या वेळेत माझ्या शैलीचा अंदाज आला आणि आपण काय चूक करत आहे ते समजलं.

मला माझ्या क्षमतेबद्दल माहिती आहे. टी20 क्रिकेट खेळत असलो तरी फक्त प्रेक्षकांचे मनोरंजन करायला आलो नाही. माझं काम सामना जिंकणे हे आहे आणि माझं पूर्ण लक्ष त्यावर असतं असंही कोहलीने सांगितलं.

या सामन्यात रोहित शर्मा 8 धावांवर बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहलीनं आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. केएल राहुलनं या सामन्यात टी-20 क्रिकेटमध्ये एक हजार धावा करत विराट कोहलीच्या विक्रमाला मागे टाकले. विराट आणि राहुलनं सर्वात जलद 100 धावांची भागिदारी केली. मात्र केएल राहुल 40 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार मारत 62 धावा करत बाद झाला. केरी प‍िएरेमं केएल राहुलला बाद केले.

दरम्यान विराट कोहली एका बाजूनं आक्रमक फलंदाजी करत असताना या सामन्यातही ऋषभ पंत बेजबाबदार खेळी करत 18 धावांवर बाद झाला. शेल्डन कॉट्रेलनं पंतला बाद केले सल्यूट करत माघारी धाडले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला श्रेयस अय्यर केवळ 4 धावा करत बाद झाला.

First published: December 7, 2019, 8:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading