पावसाच्या खेळानंतर मैदानावर विराट-गेल यांचा डान्स, पाहा VIDEO

पावसाच्या खेळानंतर मैदानावर विराट-गेल यांचा डान्स, पाहा VIDEO

वेस्ट इंडीजविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना 13 षटकानंतर पावसामुळं रद्द करण्यात आला.

  • Share this:

गयाना, 09 ऑगस्ट : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला सामना पावसामुळं 13 षटकानंतर रद्द झाला. या सामन्यात विराटच्या चाहत्यांना त्याची फलंदाजी नाही पण डान्स बघायला मिळाला. सामन्यादरम्यान कोहली आणि गेलचा डान्स आता व्हायरल होत आहे. पाऊस थांबल्यानंतर संघ मैदानावर उतरला तेव्हा ग्राउंडमॅन मैदान ठीक करत होते. यावेळी कोहली अचानक डान्स करायला लागला.

विराट कोहलीसोबत स्टेडियमचा एक कर्मचारीसुद्धा डान्स करताना दिसला. यानंतर विराटने गेलसोबतही डान्स केला. यात केदार जाधवही नंतर डान्स करायला आला. विराट कोहलीच्या या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

पहिल्यांदाच विराट कोहलीनं डान्स केला आहे असं नाही. सामन्यावेळी गंभीर असणारा विराट ब्रेकच्या दरम्यान मात्र मजेशीर गोष्टी करत असतो. वर्ल्ड कपवेळीसुद्धा विराट डगआऊटमध्ये बसून नक्कल करताना दिसला होता.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विंडीजच्या 13 षटकांत 1 बाद 54 धावा झाल्या होत्या. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. अखेर सामना रद्द करण्यात आला.

पावसानं 13 षटकांचा जरी सामना झाला असला तरी त्यात भारताच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांच्या माऱ्यासमोर गेल आणि एविन लुईस फटकेबाजी करू शकले नव्हते. सहा षटकापर्यंत वेस्ट इंडीजच्या फलंदाजांना एकही चौकार मारता आला नव्हता. पावसानंतर सामना 34 षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी एविन लुईसनं आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. लुईसनं 36 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 40 धावा केल्या. तर स्फोटक फलंदाज ख्रिस गेल 31 चेंडूत 4 धावाच करू शकला.

वर्ल्ड कपमध्ये मिळालेल्या पराभवानंतर भारत वेस्ट इंडिज विरोधात पहिलीच एकदिवसीय मालिका आहे. वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलची ही अखेरची एकदिवसीय मालिका असणार आहे. त्यामुळं दोन्ही संघ ही मालिका जिंकण्यासाठी उत्सुक आहेत.

VIDEO : सावधान! कोल्हापूर, सातारा आणि पुण्यात पावसाचा रेड अलर्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2019 08:28 AM IST

ताज्या बातम्या