INDvsWI 1st ODI पावसामुळे सामना रद्द, 13 षटकांच्या खेळात विंडीजची धावांसाठी धडपड

INDvsWI 1st ODI पावसामुळे सामना रद्द, 13 षटकांच्या खेळात विंडीजची धावांसाठी धडपड

विंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पावसामुळं फक्त 13 षटकांचा खेळ झाला त्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • Share this:

गयाना, 09 ऑगस्ट : भारतीय संघाने टी-20 मालिकेत आपले वर्चस्व गाजवल्यानंतर वेस्ट इंडिज विरोधात एकदिवसीय मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. मात्र, पहिला सामना पावसामुळं रद्द करण्यात आला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विंडीजच्या 13 षटकांत 1 बाद 54 धावा झाल्या होत्या. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. अखेर सामना रद्द करण्यात आला.

पावसानं 13 षटकांचा जरी सामना झाला असला तरी त्यात भारताच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांच्या माऱ्यासमोर गेल आणि एविन लुईस फटकेबाजी करू शकले नव्हते. सहा षटकापर्यंत वेस्ट इंडीजच्या फलंदाजांना एकही चौकार मारता आला नव्हता. पावसानंतर सामना 34 षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी एविन लुईसनं आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. लुईसनं 36 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 40 धावा केल्या. तर स्फोटक फलंदाज ख्रिस गेल 31 चेंडूत 4 धावाच करू शकला.

वर्ल्ड कपमध्ये मिळालेल्या पराभवानंतर भारत वेस्ट इंडिज विरोधात पहिलीच एकदिवसीय मालिका आहे. वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलची ही अखेरची एकदिवसीय मालिका असणार आहे. त्यामुळं दोन्ही संघ ही मालिका जिंकण्यासाठी उत्सुक आहेत.

पंतकडून मोठ्या खेळीची अपेक्षा

वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या टी-20 सामन्यात पहिल्या दोन सामन्यात पंत अपयशी ठरला होता. त्याला दोन सामन्यात 0 आणि 4 धावाच काढता आल्या होत्या. तिसऱ्या सामन्यात मात्र त्यानं तुफान फटकेबाजीसह 65 धावा करत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये दुसरं अर्धशतक केलं. भारताच्या यष्टीरक्षकानं एका टी20 सामन्यात केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. ऋषभ पंतच्या या खेळीच्या जोरावर भारतानं क्लिन स्वीप देत ही मालिका आपल्या खिशात घातली.

वाचा-असं फक्त हिटमॅन रोहितचं करू शकतो, एका फोटोत दिसले तब्बल 600 षटकार!

विराटकडे मोठे रेकॉर्ड तोडण्याची संधी

एकदिवसीय क्रिकेट नेहमीच आपला दबदबा राखणारा कोहली आता टी-20 सोबतच एकदिवसीय मालिकेतही वेस्ट इंडिजला क्लिन स्वीप देण्याच्या तयारीत आहे. यासोबतच विराटकडे एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी आहे. वेस्ट इंडिज विरोधात चांगली फलंदाजी करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्यानं 33 सामन्यात 70.81च्या सरासरीनं 1912 धावा केल्या आहेत. वर्ल्ड कपमध्ये 5 अर्धशतकं करणाऱ्या विराटला एकही शतक लगावता आले नाही, त्यामुळे वेस्ट इंडिज विरोधात विराट ही कामगिरी करू शकतो.

वाचा-वन डेतही विराटसेना राखणार का वर्चस्व? 'या' चॅनलवर पाहू शकता लाईव्ह मॅच

भारताचा संघ- रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केदार जाधव, रवींद्र जाधव, भुवनेश्वकर कुमार, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, खलील अहमद.

जम्मू-काश्मिरसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागले, मोदींचं UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 9, 2019 08:02 AM IST

ताज्या बातम्या