INDvsWI 3rd ODI : विराटला जाणवली धोनीची उणीव, पंत पडला कमी!

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात पावसामुळं 13 षटकांचाच खेळ झाला. त्यानंतर सामना रद्द करण्यात आला.

News18 Lokmat | Updated On: Aug 9, 2019 11:26 AM IST

INDvsWI 3rd ODI : विराटला जाणवली धोनीची उणीव, पंत पडला कमी!

गयाना, 09 ऑगस्ट : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी20 मालिकेत भारताने 3-0 ने विजय मिळवला आहे. त्यानंतर शुक्रवारापासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली. पहिला सामना पावसामुळं रद्द करण्यात आला. गयानात होत असलेल्या पावसाचा फटका सामन्याला बसला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात 13 षटकांचा सामना झाला. यात विंडीजनं 54 धावा केल्या.

भारतानं नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. विंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल आणि एविन लुईस मैदानात उतरले होते. सामन्याच्या चौथ्या षटकात मोहम्मद शमीने गोलंदाजी केली. यावेळी चौथ्या चेंडूवर एविन लुईसविरुद्ध पायचितचं अपिल करण्यात आलं. हे अपिल पंचांनी फेटाळून लावलं. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी डीआरएससाठी चर्चा केली. मात्र भारतानं डीआरएस घेतला नाही. गोलंदाज आणि यष्टीरक्षक दोघांनाही चेंडू आत येतोय की बाहेर हे समजलं नाही.

भारतानं डीआरएस घेतला नाही मात्र रिप्लेमध्ये चेंडू स्टम्पवर जात असल्याचं दिसत होतं. जर डीआरएस घेतला असता तर एविन लुईस बाद झाला असता. इथं नक्कीच विराटला धोनीची उणीव भासली असेल. डीआरएसच्या बाबतीत धोनीचा हात कोणीच धरू शकत नाही. त्याचा अनुभव आणि अचूकता दोन्हीमुळं अनेकदा सामन्याचं चित्र बदललं आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यातून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं माघार घेतली आहे. सध्या धोनी काश्मीरमध्ये भारतीय लष्करात ट्रेनिंग घेत आहे. यापुढे भारतीय संघ जास्तीजास्त ऋषभ पंतला संधी देणार असून धोनी त्याला मार्गदर्शन करेल.

इविन लुईसला एका धावेवर जीवदान मिळालं. त्यानंतर लुईसनं 36 चेंडूत 40 धावांची खेळी केली. यात त्यानं दोन चौकार आणि तीन षटकार मारले. लुईसने मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेतला पण पावसानं पुन्हा खोडा घातला. 6 व्या षटकात सामना थांबवण्यात आला होता. त्यानंतर 13 षटकांनी पुन्हा सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. अखेर पावसाचा जोर वाढल्यानं सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

विंडीज दौऱ्यातून डावललं, विक्रमी द्विशतक करून गंभीरला टाकलं मागे

Loading...

पावसाच्या खेळानंतर मैदानावर विराट-गेल यांचा डान्स, पाहा VIDEO

VIDEO: पार्किंग, सिग्नल आणि पुतळे सगळंच पाण्याखाली; पाहा कोल्हापुरातली भीषण स्थिती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 9, 2019 11:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...