• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • नितीश राणावर भडकले युवराजचे चाहते, 'शार्दुल' सारखीच मोठी चूक केली

नितीश राणावर भडकले युवराजचे चाहते, 'शार्दुल' सारखीच मोठी चूक केली

श्रीलंका दौऱ्यासाठी नितीश राणा (Nitish Rana) याची भारतीय टीममध्ये निवड करण्यात आली. पहिल्या वनडेमध्ये नितीश राणाला संधी मिळाली नसली, तरी तो वादात सापडला आहे.

 • Share this:
  कोलंबो, 19 जुलै : श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये (India vs Sri Lanka) नवोदितांना संधी देण्यात आली आहे. या संधीचं पहिल्या वनडेमध्ये युवा खेळाडूंनी सोनं केलं. या सामन्यात टीम इंडियाचा 7 विकेटने विजय झाला, सोबतच भारताने 3 वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला असला, तरी नव्या वादाला तोंड फुटलं आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी नितीश राणा (Nitish Rana) याची भारतीय टीममध्ये निवड करण्यात आली. पहिल्या वनडेमध्ये नितीश राणाला संधी मिळाली नसली, तरी नितीशच्या जर्सीमुळे चाहते नाराज झाले आहेत. नितीश राणा याच्या जर्सीवर 12 क्रमांक असल्यामुळे युवराज सिंगच्या (Yuvraj Singh) चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे, तसंच नितीशला वेगळ्या क्रमांकाची जर्सी देण्यात यावी, अशी मागणीही चाहत्यांनी केली आहे. युवराज सिंग हा भारतीय क्रिकेटच्या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार आहे. 2007 टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 वर्ल्ड कपमध्ये भारताने विजय मिळवला, त्यात युवराज सिंगची भूमिका सगळ्यात महत्त्वाची होती. 2011 वर्ल्ड कपमध्ये तर युवराज मॅन ऑफ द सीरिज होता. याशिवाय 2002 नॅटवेस्ट सीरिज फायनलमध्येही युवराजने भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. युवराजची ही कामगिरी बघता त्याच्या जर्सीचा 12 क्रमांक कोणालाच देण्यात येऊ नये, अशी मागणी चाहत्यांनी केली. याआधी शार्दुल ठाकूरही आंतरराष्ट्रीय सामन्यात 10 क्रमांकाची जर्सी घालून उतरला होता, तेव्हाही सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) त्याच्या जर्सीवरचा 10 नंबर बदलला. याचप्रमाणे एमएस धोनीच्या (MS Dhoni) जर्सीचा 7 नंबरही कोणाला दिला जाऊ नये, अशी मागणी चाहते वारंवार करत असतात. महान क्रिकेटपटूंच्या जर्सीचा नंबर त्यांच्या निवृत्तीसोबतच निवृत्त करण्यात यावा, अशी मागणी नेहमीच केली जाते.
  Published by:Shreyas
  First published: