• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs SL: दुसऱ्या वन-डे मध्ये युजवेंद्र चहलची जादू चालणार, मोहम्मद शमीच्या रेकॉर्डची बरोबरी होणार?

IND vs SL: दुसऱ्या वन-डे मध्ये युजवेंद्र चहलची जादू चालणार, मोहम्मद शमीच्या रेकॉर्डची बरोबरी होणार?

पहिल्या वन डे सामन्यात चहलने दोन विकेट्स घेतल्या होत्या.

 • Share this:
  नवी दिल्ली, 20 जुलै: लेगस्पिनर युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट (One Day Cricket Series) सीरिजमध्ये छान सुरुवात केली आहे. पहिल्या वन डे सामन्यात चहलने दोन विकेट्स घेतल्या होत्या. चहल आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) तब्बल दोन वर्षांनी एकत्र एकाच सामन्यात खेळत होते. त्या जोडीने त्या मॅचमध्ये चार विकेट्स घेतल्या होत्या. या दोन्ही स्पिनर खेळाडूंना 2019च्या वर्ल्ड कप टीममध्येही समाविष्ट करण्यात आलं होतं; मात्र त्या स्पर्धेत दोघांकडूनही चांगल्या खेळाचं प्रदर्शन झालं नव्हतं. त्यानंतर हे दोघेही खेळाडू वन डे मॅचमध्ये एकत्र खेळताना दिसले नाहीत. आता श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमध्ये या दोघांनाही आपला गेलेला फॉर्म परत मिळवण्याची संधी आहे. श्रीलंकेविरुद्धच्या आज (20 जुलै) सुरू झालेल्या दुसऱ्या वन डे मॅचमध्ये (IND vs SL - One Day Series) किमान चहल तरी याची सुरुवात करू शकतो. युजवेंद्र चहलने आतापर्यंत 55 वन डे मॅचेसमध्ये 94 विकेट्स घेतल्या आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमधल्या दुसऱ्या मॅचमध्ये तो सहा विकेट्स घेऊ शकला, तर तो मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) सर्वांत वेगवान 100 वन डे विकेट्स घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी करू शकतो. वन डे क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान 100 विकेट्स घेणारा भारतीय खेळाडू बनण्याचा विक्रम सध्या मोहम्मद शमीच्या नावावर आहे. त्याने 56 मॅचेसमध्ये हा विक्रम केला होता. या विक्रमापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला सहा वर्षं 17 दिवस लागले होते. चहल आता 56वा सामना खेळणार असल्याने त्याला या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर का होतोय अजिंक्य रहाणे ट्रोल? 2012 मधील हे ट्वीट ठरतंय कारणीभूत श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजच्या दुसऱ्या मॅचमध्ये चहल सहा विकेट्स घेऊ शकला नाही, तर त्याच्याकडे तिसऱ्या मॅचमध्ये जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. बुमराहने 57 वन डे मॅचेसमध्ये 100 विकेट्स घेतल्या होत्या. वन डे क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान 100 विकेट्स घेण्याच्या बाबतीत भारतीय खेळाडूंमध्ये शमीनंतर बुमराहचा क्रमांक लागतो. चहलचा स्पिन बॉलिंगमधला जोडीदार कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यानेही 58 मॅचेसमध्ये 100 वन डे विकेट्स घेतल्या आहेत. या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला दोन वर्षं 208 दिवस लागले होते. एका वन डे मॅचमध्ये 6 विकेट्स घेणं हे मुश्किलीचं काम आहे, यात काही शंका नाही; मात्र युजवेंद्र चहलने यापूर्वी असा विक्रम केला आहे. 2019 साली मेलबर्नमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये चहलने 10 ओव्हर्समध्ये 42 रन्स देऊन सहा विकेट्स घेतल्या होत्या. वन डे क्रिकेटमधली चहलची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. एका टी-20 मॅचमध्येही चहलने सहा विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. 2017मध्ये बेंगळुरूत इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-20 मॅचमध्ये त्याने चार ओव्हर्समध्ये 25 रन्स देऊन सहा विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. त्यामुळे एकाच सामन्यात सहा विकेट्स घेऊन मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची क्षमता चहलमध्ये आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या मॅचमध्ये तो ही कामगिरी करू शकतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
  First published: