• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs SL : 'आता त्याला वनडेमध्येही संधी मिळणार नाही', सेहवाग या खेळाडूवर नाराज

IND vs SL : 'आता त्याला वनडेमध्येही संधी मिळणार नाही', सेहवाग या खेळाडूवर नाराज

टीम इंडियाचा माजी ओपनर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) श्रीलंकेविरुद्धच्या (India vs Sri Lanka) वनडे सीरिजनंतर दोन खेळाडूंबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मनिष पांडे (Manish Pandey) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्याकडे रन करण्याची चांगली संधी होती, पण दोघंही अपयशी ठरले, असं सेहवाग म्हणाला.

 • Share this:
  मुंबई, 25 जुलै : टीम इंडियाचा माजी ओपनर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) श्रीलंकेविरुद्धच्या (India vs Sri Lanka) वनडे सीरिजनंतर दोन खेळाडूंबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मनिष पांडे (Manish Pandey) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्याकडे रन करण्याची चांगली संधी होती, पण दोघंही अपयशी ठरले, असं सेहवाग म्हणाला. टीममध्ये राहण्याची संधी मनिष पांडेने गमावली, अशी प्रतिक्रियाही सेहवागने दिली. मनिष पांडे चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करतो, या क्रमांकावर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), इशान किशन (Ishan Kishan) यांच्यासारखे बॅट्समन प्रमुख दावेदार आहेत, त्यांनी चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे निवड समिती त्यांना प्राथमिकता देईल, असंही सेहवाग म्हणाला. क्रिकबझशी बोलताना सेहवाग म्हणाला, 'मनिष पांडे आणि हार्दिक पांड्याकडे चांगली संधी होती, पण दोघांनीही 15-20 रनच केले, मी खूप निराश आहे. या तीन सामन्यांमध्ये जर कोणाला सर्वाधिक संधी मिळाली असेल, तर ती मनिष पांडेला. त्याला तिन्ही मॅच खेळण्याची संधी मिळाली आणि त्याला जलद रन करण्याची गरजही नव्हती, पण तरीही तो अपयशी ठरला. मनिष पांडेने मला खूप नाराज केलं. आता कदाचित त्याला वनडे टीममध्ये जागा मिळणार नाही. जर मिळालीच तर त्याला खूप वाट पाहावी लागेल. त्याने तिन्ही संधी गमावल्या. इशान किशन आणि सूर्यकुमार यादवने मधल्या फळीत रन केले, त्यामुळे निवड समिती या दोघांना संधी देईल.' मनिष पांडेने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये 3 मॅच खेळून 24.77 च्या सरासरीने 74 रन केले, त्याचा स्ट्राईक रेटही 82 चा होता. पांडेला सीरिजमध्ये एकही अर्धशतक करता आलं नाही. आपल्या उत्कृष्ट फिल्डिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या पांडेने दोन कॅचही सोडले. हार्दिकनेही 2 इनिंगमध्ये 9.50 च्या सरासरीने 19 रन केले. दुसऱ्या वनडेमध्ये तर तो शून्य रनवर आऊट झाला.
  Published by:Shreyas
  First published: