IND vs SL : जागा एक फलंदाज तीन! टीम इंडियातील भांडणामुळे भडकला कॅप्टन कोहली

IND vs SL : जागा एक फलंदाज तीन! टीम इंडियातील भांडणामुळे भडकला कॅप्टन कोहली

विराट कोहलीनं सामन्यानंतर भारतीय संघातली खेळाडूंमध्ये आपापसात भांडण लावले जात असल्याचे धक्कादायक वक्तव्य केले.

  • Share this:

पुणे, 11 जानेवारी : श्रीलंका-भारत यांच्यात झालेली टी-20 मालिका भारतानं 2-0नं जिंकली. मात्र सामन्यानंतर विराट काहीसा नाराज दिसला. विराट कोहलीनं सामन्यानंतर भारतीय संघातली खेळाडूंमध्ये आपापसात भांडण लावले जात असल्याचे धक्कादायक वक्तव्य केले. टी-20 वर्ल्ड कपमध्ये शिखर धवन आणि केएल राहुल यांच्यातील एकालाच भारतीय संघात संधी मिळेल, अशा चर्चा सुरू असताना विराटनं याबाबत खुलासा केला.

विराट कोहलीचे मोठे विधान

सामन्यांनतर विराट कोहलीनं, “रोहित, धवन, राहुल हे सर्व महान खेळाडू आहेत, चांगली फलंदाजी करण्यासाठी तिघांमध्ये सामना आहे. रोहित सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. लोकांनी खेळांडूमध्ये भांडणे लावू नयते. माझा या सर्व गोष्टींवर विश्वास नाही”, असे स्पष्ट केले. मुख्य म्हणजे बऱ्याच काळापासून सलामीला कोण फलंदाजीसाठी उतरेल यावरून वाद आहे. श्रीलंका दौऱ्यात रोहितला विश्रांती दिल्यामुळे शिखर धवनला संधी मिळाली. मात्र, टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं विराट कोणाला संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

वाचा-दिग्गज क्रिकेटपटूने पबमध्ये तरुणींसोबत केला अश्लिल डान्स, VIDEO VIRAL

केएल राहुल धवनपेक्षा सरस

गेल्या एक वर्षातील केएल राहुलची कामगिरी धवनपेक्षा खूपच चांगली आहे. धवननं वर्षभराच्या कालावधीनंतर पुण्यात झालेल्या टी-20 सामन्यात अर्धशतकी खेळी केली. धवनने 2018नंतर एकही अर्घशतक केले होते. त्यामुळं दिग्गज खेळाडूंनी टी-20मध्ये धवनला संघात जागा देऊ नये, अशी मागणी केली होती.

वाचा-अजिंक्य रहाणेनं शेअर केला वडापावसोबत फोटो, सचिननं ‘मुंबईकर’ स्टाईल दिले उत्तर

वाचा-5 वर्षे, 73 सामन्यानंतर द्रविडच्या शिष्याला विराटनं दिली टीम इंडियात जागा

दिग्गजांची धवनवर टीका

धवनच्या निवडीवर माजी क्रिकेटपटू आणि माजी मुख्य निवडकर्ता के श्रीकांत यांनी श्रीलंकेविरुद्धच्या धावांनी काही फरक पडत नाही, राहुल यांना टी -20 विश्वचषकात धवनच्या जागी निवडले जावे, असे मोठे वक्तव्य केले होते. एवढेच नव्हे तर धवनच्या जागी संजू सॅमसनला सलामीला संधी द्यावी, असे मत गंभीरनं व्यक्त केले होते. मात्र, आता धवनने दमदार पुनरागमन केले असून विराट कोहलीही त्यांच्या पाठिशी उभे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Jan 11, 2020 11:14 AM IST

ताज्या बातम्या