मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /विराटने धोनीच्या स्टाइलने मारला सिक्स, हेलिकॉप्टर शॉटचा व्हिडीओ व्हायरल

विराटने धोनीच्या स्टाइलने मारला सिक्स, हेलिकॉप्टर शॉटचा व्हिडीओ व्हायरल

शतक झाल्यानतंर विराट कोहलीने आणखी आक्रमक खेळ करत दीडशतक साजरं केलं. विराटने ११० चेंडू खेळताना नाबाद १६६ धावा केल्या.

शतक झाल्यानतंर विराट कोहलीने आणखी आक्रमक खेळ करत दीडशतक साजरं केलं. विराटने ११० चेंडू खेळताना नाबाद १६६ धावा केल्या.

शतक झाल्यानतंर विराट कोहलीने आणखी आक्रमक खेळ करत दीडशतक साजरं केलं. विराटने ११० चेंडू खेळताना नाबाद १६६ धावा केल्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 15 जानेवारी : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. गतवर्षी अखेरच्या सामन्यात शतक आणि नव्या वर्षात दोन शतके केली आहेत. श्रीलंकेविरुद्ध तिरुवनंतपुरम इथं झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराटने त्याच्या वनडे कारकिर्दीतलं ४६ वं शतक झळकावलं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ४९ शतकांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.

सचिन तेंडुलकरनंतर शतकांच्या बाबतीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. याआधी विराटने बांगलादेशविरुद्ध शतक झळकावलं होतं. त्याअगोदर त्याला शतकासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागली होती. शतक झाल्यानतंर विराट कोहलीने आणखी आक्रमक खेळ करत दीडशतक साजरं केलं. विराटने ११० चेंडू खेळताना नाबाद १६६ धावा केल्या. त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला केला. विराटने त्याच्या खेळीत १३ चौकार तर ८ षटकार मारले.

हेही वाचा : INDvsSL : चेंडू अडवताना दोघे धडकले, वेदनेनं मैदानावरच लोळले; Photo Viral

श्रीलंकेचा गोलंदाज रजिथाने टाकलेल्या ४४व्या षटकात विराटने चौथ्या चेंडूवर षटकार मारला. तेव्हा विराट धोनीच्या स्टाइलमध्ये खेळताना दिसला. चेंडू मारताना विराटने हेलिकॉप्टर शॉटसारखी बॅट फिरवली. हा सिक्स ९७ मीटर दूर गेला.

भारताकडून विराटच्या आधी सलामीवीर शुभमन गिलने शतक केलं. त्याने ९७ चेंडूत ११६ धावा केल्या. तर कर्णधार रोहित शर्मासोबत पहिल्या गड्यासाठी ९५ धावांची भागिदारी केली. विराटचं दीडशतक आणि शुभमन गिलच्या शतकाच्या जोरावर भारताने ५० षटकात ५ बाद ३९० धावा केल्या.

First published:

Tags: Cricket, Virat kohli