Home /News /sport /

IND vs SL : पुजाराची जागा घेण्यासाठी तीन खेळाडू तयार, रोहित कोणावर दाखवणार विश्वास?

IND vs SL : पुजाराची जागा घेण्यासाठी तीन खेळाडू तयार, रोहित कोणावर दाखवणार विश्वास?

श्रीलंका क्रिकेट टीमच्या भारत दौऱ्याला आजपासून (India vs Sri Lanka) सुरूवात होत आहे. टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि इशांत शर्मा (Ishant Sharma) या दिग्गजांना टीममधून (Team India) बाहेर करण्यात आलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 24 फेब्रुवारी : श्रीलंका क्रिकेट टीमच्या भारत दौऱ्याला आजपासून (India vs Sri Lanka) सुरूवात होत आहे. पहिले तीन टी-20 मॅचची सीरिज झाल्यानंतर मग 2 टेस्ट मॅच खेळवल्या जाणार आहेत. टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि इशांत शर्मा (Ishant Sharma) या दिग्गजांना टीममधून (Team India) बाहेर करण्यात आलं आहे. हे तिन्ही खेळाडू गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये आहेत. आता टीम इंडियातून डच्चू मिळाल्यामुळे त्यांना पुन्हा देशाकडून खेळता येणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. टीम इंडिया आणि निवड समिती युवा खेळाडूंना संधी देऊन भविष्याकडे बघत आहे. भारतीय टेस्ट टीममध्ये चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) बराच काळ तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करायचा. या क्रमांकावर पुजाराने अनेक मोठ्या खेळी केल्या आणि भारताला जिंकवून दिलं. टेस्ट क्रिकेटमध्ये अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या क्रमांकावर खेळणं युवा खेळाडूसाठी आव्हानात्मक असणार आहे, पण यासाठी तीन खेळाडूंची नावं पुढे येत आहेत. केएल राहुल केएल राहुलने (KL Rahul) ओपनर म्हणून आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे, पण टीमच्या गरजेनुसार राहुल वेगवेगळ्या क्रमांकावरही बॅटिंग करतो. मोठे शॉट खेळण्याची क्षमता असण्याबरोबरच टेस्ट क्रिकेटमध्ये गरजेचा असलेला डिफेन्सही राहुलकडे आहे, त्यामुळे राहुलला तिसऱ्या क्रमांकावर खेळवलं जाऊ शकतं. श्रेयसची सुरूवात शतकाने श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) त्याच्या टेस्ट क्रिकेटची सुरूवात शानदार शतकाने केली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये अय्यरने शतक केलं होतं. या कामगिरीसोबतच त्याने टेस्ट टीममध्येही त्याचा दावा ठोकला होता. रोहित शर्माकडे श्रेयस अय्यरला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. हनुमा विहारी हनुमा विहारीला (Hanuma Vihari) आतापर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये फार संधी मिळाली नाही, पण मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियात त्याने मॅरेथॉन इनिंग खेळत तळाच्या खेळाडूंना घेऊन मॅच ड्रॉ करण्यात यश मिळवलं होतं. हनुमाला जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने स्वत:ला सिद्ध केलं. तंत्रशुद्ध बॅटिंगमुळे हनुमा विहारीला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याचा विचार होऊ शकतो.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, India Vs Sri lanka, Pujara

    पुढील बातम्या