मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SL : रोहित-विराटशिवाय टीम इंडियाचा श्रीलंका दौरा, या खेळाडूंना मिळणार संधी!

IND vs SL : रोहित-विराटशिवाय टीम इंडियाचा श्रीलंका दौरा, या खेळाडूंना मिळणार संधी!

भारतीय क्रिकेट टीम जेव्हा इंग्लंडमध्ये असेल तेव्हा आणखी एक टीम इंडिया श्रीलंकेच्या (India vs Sri Lanka) दौऱ्यावर जाईल. न्यूझीलंडविरुद्धची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) झाल्यानंतर टीम इंडिया इंग्लंडमध्येच राहिल.

भारतीय क्रिकेट टीम जेव्हा इंग्लंडमध्ये असेल तेव्हा आणखी एक टीम इंडिया श्रीलंकेच्या (India vs Sri Lanka) दौऱ्यावर जाईल. न्यूझीलंडविरुद्धची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) झाल्यानंतर टीम इंडिया इंग्लंडमध्येच राहिल.

भारतीय क्रिकेट टीम जेव्हा इंग्लंडमध्ये असेल तेव्हा आणखी एक टीम इंडिया श्रीलंकेच्या (India vs Sri Lanka) दौऱ्यावर जाईल. न्यूझीलंडविरुद्धची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) झाल्यानंतर टीम इंडिया इंग्लंडमध्येच राहिल.

पुढे वाचा ...

मुंबई, 11 मे : भारतीय क्रिकेट टीम जेव्हा इंग्लंडमध्ये असेल तेव्हा आणखी एक टीम इंडिया श्रीलंकेच्या (India vs Sri Lanka) दौऱ्यावर जाईल. न्यूझीलंडविरुद्धची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) झाल्यानंतर टीम इंडिया इंग्लंडमध्येच राहिल. 18 जून ते 22 जून या काळात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होईल, यानंतर भारतीय खेळाडू इंग्लंडविरुद्धची 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळतील. 4 ऑगस्टपासून या सीरिजला सुरुवात होणार आहे. कोरोनाचं संकट आणि क्वारंटाईनचे नियम यामुळे भारतीय टीम न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतरही इंग्लंडमध्येच राहिल.

भारतीय टीम इंग्लंडमध्ये असतानाच जुलै महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे आणि टी-20 सीरिज होणार आहे. या सीरिजसाठी पूर्णपणे वेगळ्या टीमची निवड केली जाणार आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार 13 जुलैला पहिली वनडे होईल, तर 16 आणि 19 जुलैला उरलेल्या दोन्ही मॅच खेळवल्या जातील. तर 22 जुलैपासून टी-20 सीरिजला सुरुवात होईल. 24 जुलैला दुसरी टी-20 आणि 27 जुलैला तिसरी टी-20 होईल.

कोणत्या खेळाडूंना मिळणार संधी?

श्रीलंका दौऱ्यासाठी टॉप ऑर्डरमध्ये शिखर धवन, पृथ्वी शॉ, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, मनिष पांडे, इशान किशन यांना संधी मिळू शकते. शिखर धवन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत, तर संजू सॅमसनने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली. इशान किशनला आयपीएलमध्ये संघर्ष करावा लागला, पण टीम इंडियाकडून पदार्पण करताना त्याने अर्धशतक केलं. विकेट कीपर म्हणूनही इशान किशन आणि संजू सॅमसन हे दोन पर्याय असतील.

ऑलराऊंडरचीही कमी नाही

टीम इंडियाकडे सध्या ऑलराऊंडरचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, राहुल तेवतिया, शिवम दुबे आणि विजय शंकर यांचा समावेश आहे. पण हार्दिक पांड्या बॉलिंग करणार का नाही? याबाबत अजूनही शंका आहे.

कोणत्या स्पिनर्सना संधी?

श्रीलंका दौऱ्यासाठी युझवेंद्र चहलची निवड होणं जवळपास निश्चित आहे. याशिवाय कुलदीप यादव, राहुल चहर आणि वरुण चक्रवर्ती हेदेखील रेसमध्ये आहेत. चहर आणि वरुण यांनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

हे असतील फास्ट बॉलर्स?

फास्ट बॉलिंगमध्ये अनुभवी भुवनेश्वर कुमारला संधी मिळेल, याशिवाय नवदीप सैनी, दीपक चहर हेदेखील दावेदार आहेत. जयदेव उनाडकट, खलील अहमद, हर्षल पटेल आणि चेतन सकारिया यांनाही संधी मिळू शकते.

या खेळाडूंमधून होणार निवड

पृथ्वी शॉ, शिखर धवन, देवदत पडिक्कल, सूर्यकुमार यादव, इशान किशन, संजू सैमसन, मनिष पांडे, ऋतुराज गायकवाड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, राहुल तेवतिया, शिवम दुबे, विजय शंकर, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी, हर्षल पटेल, खलील अहमद, जयदेव उनादकट, चेतन सकारिया, वरुण चक्रवर्ती, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, राहुल चाहर

First published:

Tags: Cricket, India Vs Sri lanka, Team india