Home /News /sport /

IND vs SL: पहिल्या वनडेमध्ये अशी असणार टीम इंडियाची Playing XI!

IND vs SL: पहिल्या वनडेमध्ये अशी असणार टीम इंडियाची Playing XI!

टीम इंडिया 18 जुलैपासून श्रीलंका दौऱ्याची (India vs Sri Lanka) सुरूवात करणार आहे. पहिले तीन वनडे मॅच आणि मग तीन टी-20 मॅचची सीरिज होणार आहे.

    मुंबई, 16 जुलै: टीम इंडिया 18 जुलैपासून श्रीलंका दौऱ्याची (India vs Sri Lanka) सुरूवात करणार आहे. पहिले तीन वनडे मॅच आणि मग तीन टी-20 मॅचची सीरिज होणार आहे. शिखर धवन (Shikhar Dhawan) या टीमचा कर्णधार तर राहुल द्रविड (Rahul Dravid) प्रमुख प्रशिक्षक आहे. टीमचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी नवोदितांना संधी देण्यात आली आहे. आता अंतिम 11 मध्ये कोणाला संधी द्यायची, यासाठी धवन आणि द्रविड यांचा कस लागणार आहे. पहिल्या वनडेमध्ये या संभाव्य 11 जणांना घेऊन टीम इंडिया मैदानात उतरेल, असा अंदाज आहे. ओपनर : शिखर धवन, पृथ्वी शॉ शिखर धवन टीमचा कर्णधार आहे. वनडेमध्ये त्याची सरासरी 45 पेक्षा जास्त आहे. ओपनर म्हणून तो सगळ्या मॅच खेळेल हे निश्चित आहे. तर धवनसोबत पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ओपनिंगला खेळेल. ऑस्ट्रेलियातल्या खराब कामगिरीनंतर शॉने विजय हजारे ट्रॉफीमध्ये धमाका केला. एका मोसमात 800 रन करण्याचा विक्रम शॉने केला. मधली फळी : सूर्यकुमार, पांडे आणि सॅमसन सूर्यकुमार यादव, मनिष पांडे आणि संजू सॅमसन यांनी फार आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं नसलं तरी त्यांच्यात बराच आत्मविश्वास आहे. सूर्यकुमारला (Suryakumar Yadav) श्रीलंकेविरुद्ध सगळ्या सहा मॅच खेळायची संधी मिळू शकते, तर मनिष पांडेसाठी (Manish Pandey) ही अखेरची संधी असेल, असं बोललं जातंय. कर्नाटकचा हा बॅट्समन बराच काळ टीम इंडियासोबत आहे, पण त्याला टीममधलं स्थान निश्चित करता आलं नाही. संजू सॅमसन (Sanju Samson) हा प्रतिभावान खेळाडू असला, तरी त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी करता आलेली नाही. सॅमसनसाठीही श्रीलंका दौरा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी ठरेल. ऑलराऊंडर : हार्दिक आणि कृणाल या सीरिजमध्ये टीमचं लक्ष हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) असेल, कारण तो बॉलिंग करणार का नाही, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. जर बॉलिंगमध्ये त्याने फिटनेस दाखवला आणि तो यशस्वी ठरला तर टीमचं सगळ्यात मोठं टेन्शन दूर होईल. दुसरीकडे कृणाल पांड्याने (Krunal Pandya) इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये चांगली कामगिरी केली होती. याची पुनरावृत्ती तो श्रीलंकेत करण्याचा प्रयत्न करेल. फास्ट बॉलर : भुवनेश्वर आणि सैनी दुखापतीनंतर हे दोन्ही फास्ट बॉलर टीममध्ये पुनरागमन करत आहेत. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshvar Kumar) टीमचा उपकर्णधार आहे, तसंच तो टेस्ट टीममध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. दुसरीकडे नवदीप सैनीनेही (Navdeep Saini) सुरुवातीला प्रभावित केलं, पण त्यालाही कामगिरीमध्ये सातत्य दाखवावं लागेल. सैनीला जर सूर गवसला नाही, तर दीपक चहरचा (Deepak Chahar) पर्यायही टीमपुढे उपलब्ध आहे. स्पिनर : कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल मागच्या दोन वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या कुलदीप यादवसाठी (Kuldeep Yadav) ही सीरिज करो या मरो सारखीच आहे. जर त्याला पुन्हा एकदा आत्मविश्वास मिळाला तर टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) तो गेम-चेंजर ठरू शकतो. कुलदीप प्रमाणेच युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यालाही गेल्या काही काळात फॉर्मसाठी झगडावं लागलं आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, India Vs Sri lanka, Rahul dravid, Shikhar dhawan

    पुढील बातम्या